Share

‘रोहित पवारांनी आघाडीचा धर्म पाळावा अन्यथा शिवसैनिक…,’ शिवसेना खासदाराने थेट रोहित पवारांना खडसावले

rohit

अलीकडे राज्यात स्थापन झालेल्या ठाकरे सरकारमधील नाराजीनाट्य चव्हाट्यावर येत आहे. सत्तेत असलेलेच नेते एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. सरकारमधील जेष्ठ नेत्यांकडून सर्वकाही अलबेल असल्याच सांगण्यात येत आहे. मात्र चित्र काहीस वेगळं पाहायला मिळत आहे.

हे सांगण्याच कारण म्हणजे, पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकरमधील् अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. शिवसेनेच्या खासदारानं (Shiv Sena MP) थेट राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आमदार (NCP MLA) रोहित पवारांना लक्ष केलं आहे.

वाचा नेमकं घडलं काय..? सध्या नेतेमंडळी राज्यात दौऱ्यांवर आहे. तसेच सध्या शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर अहमदनगर जिल्हा शिवसंपर्क अभियानासाठी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी कर्जत येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी थेट रोहित पवारांना लक्ष केले.

रोहित पवारांना लक्ष करताना गजानन कीर्तिकर म्हणतात, ‘भाजपला डावलून राज्यात ठाकरे सरकार स्थापन करण्यात रोहित पवार यांचे आजोबा शरद पवारांचे मोठे योगदान आहे. मात्र असे असले तरीदेखील रोहित पवार यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर दबाव टाकण्याचे धंदे बंद करावेत, असे कीर्तिकर यांनी म्हंटले आहे.

पुढे बोलताना कीर्तिकर म्हणाले, ‘शिवसेनेला जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये वाटा देण्यात यावा. याचबरोबर मतदारसंघामध्ये होणार्‍या विकास कामांमध्ये शिवसैनिकांना देखील सहभागी करून घ्यावे. तसेच शिवसैनिकांना  विश्वासात घेऊन वाटचाल करावी, असं त्यांनी सांगितले.

दरम्यान, कीर्तिकर पुढे म्हणतात, ‘अलीकडे शिवसेना पदाधिकार्‍यांच्या अनेक तक्रारी पुढे येत आहे. यामुळे सत्तेत असूनही परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे रोहित पवारांनी आघाडीचा धर्म पाळावा अन्यथा शिवसैनिक ही बांधिल राहणार नाहीत, असा गर्भित इशाराच कीर्तिकर यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या
नवाब मलिक मुसलमान आहेत म्हणून…; शरद पवार आणि मोदींच्या ‘त्या’ भेटीवरून ओवेसी भडकले
लघवी आणि सांडपाण्यापासून बनवलेल्या ‘या’ बीअरला जगभरातून आहे प्रचंड मागणी; फायदे ऐकून बसेल धक्का
२६ दिवस जेलमध्ये राहणाऱ्या आर्यनला ड्रग्ज प्रकरणातून मिळाली क्लीन चिट; आता नुकसान भरपाई सुद्धा मिळणार
मोदी करणार ‘गुजरात टायटन्स’ ला सपोर्ट? फायनलपूर्वी गुजरातमध्ये दाखल झाल्याने चर्चेला उधाण

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now