राजकीय वातावरण तापलेलं असतानाच एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. गुरुवारी एमआयएमचे वरिष्ठ नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. यावरुन आता नवीन वादाला तोंड फुटले आहे.
अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंतर राज्यातलं वातावरण तापलं आहे. याच मुद्यावरून आता मनसेने शिवसेना घेरले आहे. थेट मनसेने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष करत काही संतप्त सवाल उपस्थित केले आहे. यामुळे आता हे प्रकरण आणखीच चिघळणार असल्याच बोललं जातं आहे.
याच मुद्याला धरून मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी शब्दात निशाणा साधला आहे. शिवरायांच्या भूमीत औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय?, असा संतप्त सवाल उपस्थित करत जमीनदोस्त करा हे थडगं, अशी मागणी गजानन काळे यांनी केली आहे.
पुढे गजानन काळे म्हणाले, ‘शिवरायांच्या भूमीत औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय?; ते जमीनदोस्त करा, म्हणजे या अवलादी तिथे माथा टेकायला येणार नाहीत, अशी मागणी करत गजानन काळे हे संतप्त झालेले पाहायला मिळाले. याचबरोबर काळे यांनी बाळासाहेब ठाकरेंची देखील आठवण काढली.
याबाबत बोलताना गजानन काळे म्हणाले, ‘माननीय बाळासाहेब ठाकरेही हेच म्हणाले होते, बाळासाहेबांचे काहीच ऐकायचे नाही आहे का?, असा सवाल उपस्थित करत ‘तरी औरंगाबादच्या नामांतरावरून सरळ सरळ पलटी मारली आहेच,’ असा खोचक टोला गजानन काळे यांनी मुख्यमंत्र्यांना आहे.
तर दुसरीकडे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ‘खुल्ताबादमध्ये गेल्यानंतर सर्वजण औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतात यावरुन कोणताही वाद निर्माण करणे चुकीचं असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे. दरम्यान, या प्रकरणावरून राजकरण चांगलच तापलं आहे.
महत्वाच्या बातम्या :-
‘रानबाजार’च्या बोल्ड सीन्समुळे ट्रोल झाल्यानंतर प्राजक्ता माळीचे सडेतोड प्रत्यूत्तर; म्हणाली, मी अपवाद नाही…
दिंडोरीच्या स्वामी समर्थ केंद्रात ५० कोटींचा भ्रष्टाचार; अण्णासाहेब मोरेंच्या विरोधात पुराव्यानिशी तक्रार दाखल
“हे शिवलिंग नसून कारंज्याचा मधोमध तुटलेला दगड”, व्हायरल व्हिडिओवर काँग्रेसच नेत्याचं विधान