Share

“शिल्लक सेनेने दसरा मेळाव्यात ओवेसीला बोलवल्याचे समजते खरं का?”

udhav thackeray
राजकीय वर्तुळात दसरा मेळाव्यासाठी आत्तापासूनच हालचाली सुरू झाल्या आहेत. राजकीय घडामोडींमद्धे आता चर्चेत आलेला विषय म्हणजे, दरवर्षीचा दसरा मेळावा..! शिवसेनेमध्ये दोन गट स्थापन झाल्यामुळे यंदा शिवतीर्थावर दसरा मेळावा कोण आयोजित करणार असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे.

शिंदे गट आणि ठाकरे गट आता दसरा मेळाव्यावरून आमने-सामने आले आहेत. अशातच माध्यमांशी बोलताना काही दिवसांपूर्वी शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मनसेव जहरी टीका केली होती. ‘राज ठाकरे उद्या कोणाच्याही व्यासपीठावर दिसतील,’ असा टोला पेडणेकर यांनी लगावला होता.

‘राज ठाकरे फक्त शिवसेना आणि उद्धव ठाकरे आहेत, त्या व्यासपीठावर येणार नाहीत. यामुळे पक्षाला कोणती विचारधाराच राहिलेली नाही हेच स्पष्ट होते, असा आरोपही पेडणेकर यांनी केला होता. याचाच धागा पकडत आता मनसे शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.

मनसे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी ट्विट करत म्हंटलं आहे की, शिल्लक सेनेच्या नेत्यांना स्वप्नात पण मनसे व राजसाहेब दिसू लागले आहेत. आता यांच्या शिल्लक सेनेच्या पक्षप्रमुखांनी अबू आझमीच्या समाजवादी पक्षाशी युती केली तरी महाराष्ट्राला नवल वाटणार नाही.’

तसेच शिल्लक सेनेने दसरा मेळाव्यात ओवेसीला बोलवल्याचे समजते खरे का? असे खोचक ट्विट काळे यांनी केले आहे. बाळासाहेबांचे विचार गुंडाळून राष्ट्रवादीची लाचारी चालते आणि विचार, निष्ठा, हिंदुत्वची प्रवचन मनसेला देणार, असे गजानन काळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान,  शिवाजीपार्कवर कुणाचा दसरा मेळावा होणार? यावरून दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला आहे. शिवाजी पार्कवरील मेळाव्यासाठी महानगरपालिकेकडे परवानगी मागण्यासाठी शिवसेनेकडून दोनदा पत्र देण्यात आले आहे. मात्र, यावर पालिकेने अजून कुठलाही निर्णय दिलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या
पुण्यात डुप्लिकेट मुख्यमंत्र्याची हवा; मंडळांकडून मिळतायत आरतीचे आमंत्रणे, फोटो पाहून थक्क व्हा
Shilpa Shetty: पाय दुखत असतानाही गणपतीसमोर नाचली शिल्पा शेट्टी; चाहत्यांनी ठोकला सला
Ajit Pawar : बबनराव पाचपुतेंना पाडायला अजित पवारांनी खेळला गेम; ‘या’ बड्या नेत्याला उतरवणार रिंगणा
Virat Kohali: पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर विराट-अनुष्का झाले इतके नॉटी, जीभ बाहेर काढून एकमेकांसोबत करू लागले..

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now