Share

बुरख्याचा वापर करून सोन्याची तस्करी करणारी महीला गजाआड; ‘अशी’ अडकली पोलीसांच्या जाळ्यात; पहा व्हिडीओ

सोन्याची तस्करी करण्यासाठी महिलेने एक नामी शक्कल लढवली आहे. तिने लढवलेली शक्कल पाहून अधिकारी देखील चक्रावून गेले आहेत. महिला तब्बल 18 लाख रुपये किमतीचे आणि 350 ग्रॅम वजनाचे सोने घेऊन जात असताना विमानतळावर हा प्रकार उघड झाला आहे.

तेलंगणातील हैदराबादमधील शमशाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी एका महिला प्रवाशाकडून सुमारे 18 लाख रुपये किमतीचे आणि 350 ग्रॅम वजनाचे सोने जप्त करण्यात आले. सोने लपवण्यासाठी जी शक्कल या महिला प्रवाशाने लढवली होती ती बघून सगळेच चक्रावून गेले.

या महिलेने परिधान केलेल्या बुरख्यात चक्क 18 लाखांचे सोने चिकटवले होते. बुरख्यावर मोती जडल्यासारखे दिसत होते. पण मेटल डिटेक्टरमुळे ती मशीनला फसवू शकली नाही मशीनमुळे ते मोती नसून सोने असल्याचे लक्षात आले आणि ती पकडली गेली.

तेथे महिलेला बुरखा काढण्यात सांगितले आणि बुरख्यातून लहान सोन्याच्या गोळ्या काढण्यात आल्या. या घटनेचे फोटो समोर आले आहेत. या महिला प्रवाशाने बुरख्यावर शिलाई केलेले रोडियम लेपित मण्यांच्या स्वरूपात सोने लपवले होते. जप्त केलेल्या सोन्याचे वजन 350 ग्रॅम असल्याचे सांगण्यात येत आहे.

https://twitter.com/hydcus/status/1497916919092973568?t=8sh1KtDxKsM7y40-Js641w&s=19

पोलिसांनी महिलेला हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरच अटक केली आहे. या महिला प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. महिलेनी लढवलेली शक्कल जबरदस्त होती. मात्र मेटल डिटेक्टरमुळे ती चांगलीच फसली गेली.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बुरखा घातलेल्या महिलेने हे सोने रोडियमने गुंडाळलेल्या मण्यांच्या स्वरूपात लपवले होते, जे बुरख्याला शिवले होते. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले सोने मणी प्रकाराचे होते. त्याचा शोध घेतला त्यावेळचा व्हिडीओही रेकॉर्ड करण्यात आला आहे.

क्राईम

Join WhatsApp

Join Now