Share

गडकरींनी ९०० कोटी खर्चून केला विजयपूर बायपास अन् फक्त अडीच महीन्यात पडल्या भेगा

सोलापूर रस्त्याहून विजयनगरच्या दिशेने होणारी जड वाहनांची वाहतूक स्थानिक नागरिकांना त्रासदायक ठरत होती. याला पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी केगावं ते हत्तुर हा २२ किलोमीटरचा बायपास केंद्राकडून तयार करण्यात आला. मात्र आता त्या महामार्गाला भेगा पडल्याचे निदर्शनास आले. (Vijaypur bypass at a cost of 900 crores and the cracks fell in just two and a half months)

२०१८ साली केगाव ते हत्तुर बायपास तयार करण्याची घोषणा झाली. २०२२ रोजी ९०० कोटी रुपये खर्च करून तयार झालेल्या या बायपासचे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

लोकार्पण होऊन तीन महिने पूर्ण झाले नाहीत, बायपासच्या सुरुवातीला पुलाजवळील रस्त्याला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ते पर्यायी रस्त्याचा वापर करत आहेत.

रस्त्याच्या निकृष्ट दर्जामुळे वाहनधारक या रस्त्यावर प्रवास करायला अक्षरशः घाबरत आहेत. सोलापूर शहरातून बायपासला आणि बायपासवरून शहरात जाण्यासाठीचा रस्ता अक्षरशः उखडला आहे.

बायपासच्या सुरुवातीला पुलाजवळील रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. रस्त्याच्या त्याठिकाणी बॅरीगेट्स लावून भेगा बुजवण्याचे काम सुरू झाले आहे. पण अजूनही त्यावर कायमचा उपाय करण्यात आलेला नाही.

बायपासच्या खड्डे दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. केगाव जवळील रस्त्याला पडलेल्या भेगा दुरुस्तीसाठी तो पॅच काढून नवीन पॅच लावला जाणार आहे, असे संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. परंतु अल्पावधीत झालेल्या रस्त्याच्या या अवस्थेला बघून कामाच्या दर्जाबाबतच लोकं प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-
‘उद्धव ठाकरे देशाचे नेतृत्व करतील या भीतीने भाजपने शिवसेनेत फूट पाडली’
“पुरंदरेंनी लिहीलेला इतिहास अन्यायकारक वाटत असेल तर पवारांनी स्वतः शिवचरित्र लिहावे”
याला निष्ठा ऐसे नाव! मुस्लिम मावळ्याने उद्धव ठाकरेंना स्वतःच्या रक्ताने लिहीलं पत्र; काहीही झालं तरी ठाकरेंसोबतच राहणार

ताज्या बातम्या इतर राजकारण

Join WhatsApp

Join Now