करण जोहर (Karan Johar), आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) लग्नाच्या प्रत्येक फंक्शनमध्ये पोहोचला आणि प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला. कलर्स टीव्ही शो ‘हुनरबाज देश की शान’च्या सेटवर आलिया-रणबीरच्या मेहेदी फंक्शनमधील एक मजेदार खुलासा करणने केला. परिणीती चोप्रा, मिथुन चक्रवर्ती आणि करण जोहर या शोचे जज आहेत तर भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया हे शो होस्ट करत आहेत.(Funny thing happened with Karan Johar during Alia-Ranbir’s Mehndi)
कलर्स टीव्हीने ‘हुनरबाज देश की शान’ या शोच्या सेटवरील व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये भारती सिंह करण जोहरला चिडवत म्हणते की, आलिया-रणबीरच्या लग्नात कोणी काय परिधान केले हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण अस्वस्थ होते, पण तुमचा फोटो सर्वात आधी आला. भारतीच्या या बोलण्याने सर्वजण हासू लागतात.
यानंतर परिणीती चोप्राने करण जोहरचा हात वर केला आणि म्हणाली की, एक सेकंद आधी मी तुम्हाला एक गोड गोष्ट दाखवते, यासोबत ती करणचे हात उघडते, ज्यावर मेहंदी बनवलेली असते. हे पाहून सर्वजण टाळ्या वाजवू लागले. त्यानंतर करण म्हणाला की, मेहंदी सेरेमनीला माझ्यासोबत काय घडले ते मी सांगतो.
करण म्हणतो मी पहिल्यांदाच हातावर मेहंदी लावली होती. आलियाचे लग्न होईल त्यावेळी मी नक्कीच मेहंदी लावेन असे मला आधीपासूनच वाटत होते. मला मेहंदी लावायची सवय नाही आणि त्यातच खूप गरमही होत होत. मी मेहंदी लावली आणि मग मी माझा घाम पुसायला सुरुवात केली. माझ्या हाताला मेंदी लावली होती हे मी विसरलो होतो, त्यामुळे सर्व मेहंदी माझ्या डोक्याला, कपाळावर, चेहऱ्यावर लागली गेली.
करण पुढे म्हणतो, मग मला लगेच हात धुवावे लागले. तिथे पुनीत जो आलियाचा मेकअप आर्टिस्ट आहे तो आला आणि माझ्या चेहऱ्यावर कोणतेतरी लोशन लावले ते मला माहीत नाही, नाहीतर संपूर्ण मेहंदीचा रंग माझ्या चेहऱ्यावर चढला असता. करणचे म्हणणे ऐकून भारती म्हणते, थैंक गॉड, मेकअप आर्टिस्टने थोडासा मेकअप केला नाहीतर पान खाल्ल्यानंतर आजोबां जे करतात तसं वाटलं असत.
महत्वाच्या बातम्या-
आलिया-रणबीरच्या मेहंदीच्या वेळी करण जोहरसोबत घडला होता मजेशीर प्रकार, वाचून पोट धरून हसाल
करण जोहर माझ्या मिशांवर झाला होता घायाळ, ट्विंकल खन्नाचा विचित्र खुलासा
VIDEO: करण जोहरने भारती-हर्षच्या मुलाला लॉन्च करण्यास दिला नकार, मग
अजय देवगण-काजोलची लव्हस्टोरी करण जोहरच्या फिल्मपेक्षा कमी नाही, रोमांच आणि रोमांसने आहे परिपुर्ण