काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा केली. आणि त्यानंतर एकच गदारोळ पाहायला मिळाला. तर दुसरीकडे राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याची घोषणा करताच मनसे कार्यकर्ते तयारीला लागले. मनसे कार्यकर्त्यांना अयोध्येत जाण्यासाठी १० एक्स्प्रेस रेल्वेगाड्या बूक करण्यासंदर्भातही बोलणी सुरु होती.
मात्र अशातच राज ठाकरेंनी एक ट्विट केलं आणि मनसैनिकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. ‘राज साहेब अयोध्या दौऱ्यावर येण्याआधी हात जोडून माफी मागण्याची मागणी केली. तसेच माफी न मागितल्यास उत्तर प्रदेशात घुसून देणार नाही, अशी धमकी भाजप खा. ब्रिजभूषण सिंह यांनी दिली होती.
यानंतर राजकारण चांगलंच तापलं. राज ठाकरेंचा अयोध्या दौरा होणार की नाही? अशी चर्चा सुरू होती. अखेर राज यांनी दौरा स्थगित केला आहे. राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलंय की, ‘तूर्तास अयोध्या दौरा स्थगित, महाराष्ट्र सैनिकांनो या.. यावर सविस्तर बोलू,’ असं ट्विट सध्या राज ठाकरेंनी केलं आहे.
तर आता यावरूनच सोशल मिडियावर राज ठाकरे ट्रोल होऊ लागले आहेत. दौरा स्थगित झाल्यापासून सोशल मीडियावर सध्या मजेशीर प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसत आहे. ‘रावण लाख वाईट होता पण तिथल्या भय्यांना घाबरून अयोध्या दौरा कधी रद्द केला नव्हता,’ अशा मजेशीर मीम्स सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतं आहेत.
दरम्यान, ‘गनिमी कावा करून वेशांतर करून राम भगवान चे दर्शन घ्या,’ असे खोचक सल्ले देखील नेटकऱ्यांनी राज ठाकरेंना दिले आहेत. याचबरोबर राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत बॅनर बाजी देखील करण्यात आली होती. नेटकऱ्यांनी यालाच लक्ष करत म्हंटलं आहे की, ‘केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटवू या बॅनर वर खर्च केलेला पैसा वाया गेला तर..’
‘रावण लाख वाईट होता पण तिथल्या भय्यांना घाबरून अयोध्या दौरा कधी रद्द केला नव्हता,’ अशा प्रतिक्रिया सोशल मिडियावर उमटल्या आहेत. याचबरोबर ‘ते रेल्वेची तिकिटं बुक केली होती ती सर्व भैय्यांना मोफत देऊन टाका साहेब, तेवढेच आशीर्वाद भेटतील,’ अशाही प्रतिक्रिया आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
२ तासांचा पेपर ३ मिनिटांत संपवणाऱ्या ४ UPSIच्या उमेदवारांची तुरुंगात रवानगी; वाचा संपूर्ण प्रकरण…
तारक मेहता यांनी खरंच शो सोडला का? अखेर निर्मात्यांनी सोडले मौन, चाहतेही झाले हैराण
केतकी चितळे आता पक्की अडकली; आणखी एका गुन्ह्यात कोर्टाने केली पोलीस कोठडीत रवानगी
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित! दौऱ्याला कडाडून विरोध करणारे ब्रिजभूषण सिंह स्पष्टच बोलले, म्हणाले…