चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली असून रॉकिंग स्टार यशचा आगामी चित्रपट KGF Chapter 2 चा ट्रेलर रिलीज झाला आहे. दमदार अॅक्शन आणि संवादांनी भरलेला KGF Chapter 2 चा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. एकीकडे या चित्रपटाचा ट्रेलर यूट्यूबवर ट्रेंड करत आहे, दुसरीकडे या चित्रपटासाठी कलाकारांनी घेतलेल्या फिज बद्दल चर्चा होत आहे.
KGF Chapter 2 च्या ट्रेलरला मिळालेल्या लोकांच्या प्रतिसादानंतर आशा आहे की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडेल. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांना चित्रपट आणि स्टारकास्टबद्दल अधिकाधिक जाणून घ्यायचे आहे. तसेच या चित्रपटातील कलाकारांनी घेतलेल्या फिजबद्दल देखील अनेकांना उत्सुकता आहे, या सगळ्याची माहिती आम्ही आज देणार आहोत.
KGF Chapter 2 च्या स्टारकास्टमध्ये कन्नड स्टार यश तसेच संजय दत्त, श्रीनिधी शेट्टी, रवीना टंडन, प्रकाश राज आणि मालविका अविनाश यांचा समावेश आहे. KoiMoi च्या अहवालानुसार, यशने KGF च्या पहिल्या भागासाठी 15 कोटी रुपये आकारले होते.
आता KGF Chapter 2 साठी त्याची फी 10 कोटींनी वाढली आहे. म्हणजेच यशने KGF Chapter 2 साठी एकूण 25 कोटी रुपये फी घेतली आहे. संजय दत्त या चित्रपटात एका भयानक खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमध्ये संजय दत्त अँक्शन अवतारात दिसत आहे. यातील अधीराच्या भूमिकेसाठी संजय दत्तने 9 कोटी रुपये घेतले आहेत.
दुसरीकडे, श्रीनिधी शेट्टीबद्दल बोलायचे झाले तर, चाहते तिला पुन्हा चित्रपटात पाहण्यासाठी आतुर आहेत. माहितीनुसार, श्रीनिधीने या चित्रपटासाठी 3 कोटी रुपये घेतले आहेत. या दोघांपैकी रवीना टंडनने या चित्रपटासाठी दीड कोटी रुपये घेतले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, केजीएफ चॅप्टर 2 हा चित्रपट 14 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे कथानक प्रशांत नील यांनी लिहिले आहे तर विजय किरागंदूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यामुळे आता बॉक्सऑफीसवर हा चित्रपट किती कमाई करणार याची चर्चा सर्वत्र होत आहे.