कोरोना काळानंतर आता अनेक वेगवेगळ्या संस्था आणि विभाग यांनी आपले नियम बदलले आहेत. तर काहींनी जुने नियम पुन्हा नव्याने आणले आहेत. यातच रिझर्व्ह बँकेकडून देखील एक जुनाच पण नव्याने निर्णय घेण्यात आला आहे. हा नियम बँकेच्या वेळेसंदर्भात आहे.
रिझर्व्ह बँकेकडून जुनाच पण नव्याने एक निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा फायदा नोकरदार वर्गाबरोबरच अनेकांना होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने आता बँक सुरु करण्याचा नवा निर्णय घेतला असून आधी पेक्षा आता एक तास अगोदरच बँकांचा व्यवहार सुरु होणार असल्याचे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले आहे.
महामारी येण्याआधीही बँकांच्या वेळ ही 9 वाजताच होती. मात्र कोरोनाचे संकट वाढल्यानंतर या वेळेत बदल करण्यात आला आहे, त्या वेळेत बदल करुन 10 वाजता बँक सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सध्या कोरोना महामारीतून देश बाहेर आल्याने बँकांचे व्यवहार सुरु होण्याची वेळ पहिल्यासारखीच करण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे कार्यालयीन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समाधान मिळाले आहे. अनेक नोकरदार वर्गाना शनिवार किंवा रविवारी सुट्टी असते, मात्र यादिवशी ते बँकेतील कामं करु शकत नाहीत, कारण बँकांचेही शनिवारी अर्धा दिवसच व्यवहार चालू असतात.
आरबीआयच्या या निर्णयामुळे ऑफिसला जाणारे जे कर्मचारी आहेत, ते बँकेतील काम करुन आपापल्या ऑफिसला जाऊ शकतात. मात्र बँका बंद होण्याच्या वेळेत कोणताही बदल झालेला नाही. पूर्वीच्या वेळेतच बँका बंद होणार आहेत. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांसोबतच ग्राहकांना देखील काम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळेल.
ही नवीन सुविधा 18 एप्रिल 2022 पासून म्हणजेच आजपासून लागू झाली आहे. आरबीआयने बँकेच्या ग्राहकांसाठी ATM संबंधित एक नवीन घोषणा केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून यूपीआयद्वारे पैसे काढण्याला परवानगी देण्यात आली आहे.