friends shocking thing with therie friend in mumbai | मित्र मस्तीत कधी काय करतील हे सांगता येत नाही. पण काहीवेळा मजा मस्ती जीवावरही बेतण्याची शक्यता असते. अनेक घटना अशा घडल्या सुद्धा आहे. मजा मस्ती करताना ती चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे काहींचा जीवही गेला आहे. अशात मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
संंबंधित घटना ही मुंबईच्या बदलापूरमधील मोहपाडची आहे. घटनेत काही मित्रांनी मिळून एका तरुणाच्या पार्श्वभागात थेट लाटणं घातल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे मित्रांनी या घटनेचा व्हिडिओ काढत त्याला ब्लॅकमेल सुद्धा केले होते.
१२ नोव्हेंबरला एक मित्र त्याच्या मित्रांच्या घरी गेला होता. तिथे आणखी काही मित्र आले होते. त्यावेळी त्यांनी त्या एकासोबत मस्ती करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी त्याच्यासोबत काही लैंगिक चाळे केले. इतकंच नाही, तर त्यांनी त्याचा व्हिडिओही काढला.
धक्कादायक गोष्ट म्हणजे यावेळी काही मित्रांनी त्याच्या पार्श्वभागात थेट लाटणं घातले. त्याचा व्हिडिओही त्यांनी काढला. यावेळी मस्करी असली तरी त्या तरुणाला गंभीर जखमा झाल्या. त्यामुळे त्याला उपचार घेण्यासाठी थेट रुग्णालयात जावे लागले आहे.
तसेच मित्रांनी त्याला व्हिडिओ काढून ब्लॅकमेल सुद्धा केले. त्यामुळे तरुणही खुप वैतागला होता. सतत ब्लॅकमेल करत असल्यामुळे संतापलेल्या तरुणाने थेट पोलिस ठाणे गाठले आणि आपल्या मित्रांविरोधात तक्रार नोंदवली आहे.
त्या तरुणाने आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार त्या पोलिसांना सांगितला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्या चार तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. इतकंच नाही, पोलिसांनी त्यांना ताब्यातही घेतले आहे. ती सर्व मुलं अल्पवयीन असून त्यातला एकच मुलगा २५ वर्षांचा आहे. आता पोलिस त्यांच्यावर कारवाई करणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
दिनेश कार्तिक घेणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; भावूक होत म्हणाला संघातील सर्व खेळाडूंनी खूपच..
जगावर येतय आजवरच सर्वात मोठं संकट; लोकं थंडीने गारठणार, मशीन्सही पडणार बंद, सर्वात मोठा धोका तर…
suryakumar yadav: न्यूझीलंड टी-20 मालिकेनंतर सूर्यकुमार यादवसाठी आली आनंदाची बातमी, हार्दिकचाही मोठा फायदा