पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातून समोर आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील एका गावात पतीने आपल्या पत्नीवर मित्राकडून बलात्कार घडवून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पीडित महिलेने तिच्या पती आणि त्याच्या मित्राविरोधात हिंगोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.(friend-raped-wife-and-husband-stand-behind-door-maharshtra)
हिंगोली पोलिसांनी या प्रकरणात पतीच्या मित्राविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पीडित महिलेच्या पतीविरोधात देखील पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. हिंगोली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेची संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात चर्चा होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आपल्या पत्नी व मुलीसोबत हिंगोली जिल्ह्यातील सवड या गावात राहतो. २० जानेवारी रोजी पीडित महिला घरी एकटीच होती. त्यावेळी आरोपी पती त्याच्या मित्राला घरी घेऊन आला. त्यानंतर पतीने घराबाहेर थांबून मित्राला घरात पाठवून स्वतः च्या पत्नीवर बलात्कार घडवून आणला आहे.
यावेळी विकृत पती घराबाहेरच थांबून पहारा देत होता. मित्राने आरोपीच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर अत्याचार केले. या घटनेनंतर पीडित महिलेने हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन पती व त्याच्या मित्राविरोधात फिर्याद दखल केली. पोलिसांनी पीडित महिलेच्या पतीच्या मित्राविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिलेने स्वतः च्या पतीविरोधात देखील तक्रार दाखल केली. पीडित महिलेने आरोपी पतीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आरोपी पतीने यापूर्वीही चारित्र्यावर संशय घेत अनेकदा मानसिक त्रास दिल्याचा आरोप पीडित महिलेने तक्रारीत केला आहे. पतीने आपल्यावर मित्राकडून बलात्कार घडवून आणला आहे, असा आरोप पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.
या प्रकरणात हिंगोली ग्रामीण पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केली नाही. या घटनेचा हिंगोली ग्रामीण पोलिस खोलवर जाऊन तपास करत आहेत. या प्रकरणात पीडित महिलेला न्याय मिळावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून मराठवाड्यात स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
“मी तुमचा कट्टर कार्यकर्ता पण तुम्ही ऊसाचे बिल न दिल्याने माझा भाचा तळमळून मेला”
अमोल कोल्हेंच्या समर्थनार्थ नाना पाटेकर मैदानात; म्हणाले, नथुराम गोडसेची भूमिका साकारणं म्हणजे…
सचिनचा फॅन सुधीरला पोलीस स्टेशनमध्ये मारहाण का झाली? धक्कादायक कारण आले समोर