Share

घृणास्पद! चार शिकाऱ्यांनी जंगलात घुसून केला ‘या’ मुक्या प्राण्यावर बलात्कार, व्हिडीओही काढला

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील (Tiger Project) साडेचार फूट उंचीच्या इग्वानावर (घोरपड) बलात्कार केल्याप्रकरणी महाराष्ट्र वनविभागाने (Maharashtra Forest Department) एकाला अटक केली आहे. गोठणे येथील गाभा परिसरात गुरुवारी घडलेल्या घटनेची माहिती देताना सांगली वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार सशस्त्र पुरुष जंगलात फिरताना दिसत आहेत.(Four hunters also raped and videotaped the animal)

त्यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि एकाला पकडण्यात यश आले, तर बाकीचे पळून गेले. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा मोबाईल तपासला असता हा धक्कादायक प्रकार वनाधिकाऱ्यांना समजला. या ‘अमानवी आणि घृणास्पद’ कृत्याचे त्याच्याच मोबाईलवरून चित्रीकरण करण्यात आले. व्हिडिओमध्ये चौघांपैकी एक जण हे कृत्य करताना दिसत आहे. या मोबाईलमधून साडेचार फूट लांब इग्वानावर बलात्कार झाल्याचे रेकॉर्डिंग होते.

गुप्त माहितीच्या आधारे उर्वरित तिघांना रत्नागिरी जिल्ह्यातील हातिव गावातून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन पिस्तूल, दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. संदीप तुकाराम पवार, मंगेश कामतेकर, अक्षय कामतेकर, रमेश तुकाराम घाग अशी चौघांची नावे आहेत. त्यांना (आरोपी) न्यायालयात हजर करणार असून कायदेतज्ज्ञांची सर्वतोपरी मदत घेणार असल्याचे विभागीय वन अधिकारी विशाल माळी यांनी सांगितले.

वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत इगुआना ही वाघ आणि सिंहासारखी राखीव प्रजाती आहे. दोषी आढळल्यास त्यांना सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. वाघांची संख्या मोजण्यासाठी लावण्यात आलेल्या ट्रॅकर कॅमेऱ्यात हे शिकारी टिपले गेले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी लावण्यात आलेल्या ट्रॅकर कॅमेऱ्यात 31 मार्च रोजी तीन आरोपी शस्त्रांसह जंगलात जाताना दिसत आहेत.

आरोपींकडून जप्त केलेल्या मोबाईलची वनअधिका-यांनी चौकशी केली असता, आरोपी घोरपडीसोबत बलात्कार करत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला. अधिकाऱ्यांना मोबाईलमध्ये ससे, पोर्क्युपाइन्स, हरणांचे फोटोही सापडले. अधिका-यांनी जेव्हा आरोपीला विचारले की बलात्कारानंतर पीडित प्राणी जिवंत आहे की नाही, तेव्हा आरोपीने कोणतेही उत्तर दिले नाही.

महत्वाच्या बातम्या-
महिलांवर बलात्कार करत आहेत एलियन, अनेकजणी गर्भवती; अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचा खळबळजनक खुलासा
महिलांना घरातून उचलून नेऊन बलात्कार करण्याची उघडपणे दिली धमकी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महंतवर गुन्हा दाखल
अप्लवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप असलेल्या बाबाच्या घरावर चालवला बुलडोझर, वकीलांनीही केला हल्ला
धक्कादायक! गरोदर बकरीवर बलात्कार करून केले हे भयानक कृत्य, हॉटेल कर्मचाऱ्याला अटक

 

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now