Share

‘या’ चार भावांनी मिळून श्रीलंकेची अर्थव्यवस्था डबघाईला आणली, नागरिकांचा आरोप

rajpakshe family

सध्या श्रीलंकेला मोठा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. श्रीलंकेमध्ये सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. श्रीलंकेमध्ये साखर २०० रुपये किलो, तांदूळ ५०० रुपये किलो, एक कप चहा १०० रुपये, पेट्रोल २५४ रुपये आणि डिझेल(Disel) २१४ रुपये झाले आहे. त्यामुळे श्रीलंकेतील नागरिक सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत.(four brother resposible for shrilanka economic crisis)

गुरुवारी श्रीलंकन नागरिकांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी जमाव हिंसक झाला होता. काही वर्षांपूर्वी पैसा आणि संपत्तीने सदन असणाऱ्या या राष्ट्राला आता आर्थिक संकटाचा सामना का करावा लागत आहे? यामागे अनेक कारणे आहेत. त्यातील एक कारण श्रीलंकन सरकारचा बेजबाबदारपणा हे आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून श्रीलंकेत राजपक्षे कुटुंबाची सत्ता आहे. सध्या राजपक्षे कुटुंबातील चार भाऊ श्रीलंकन मंत्रिमंडळात महत्वाच्या खात्याचे मंत्री आहेत. गोटाबाया राजपक्षे राष्ट्रपती आहेत. महिंद्रा राजपक्षे पंतप्रधान आहेत. बसिल राजपक्षे अर्थमंत्री आहेत. तर चमल राजपक्षे कृषी मंत्री आहेत. पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांचा मुलगा देखील मंत्रिमंडळात आहे.

राजपक्षे कुटुंबातील सर्वजण मिळून श्रीलंकेवर सत्ता गाजवत आहेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. राजपक्षे कुटुंबातील चार भावांनी मिळून श्रीलंकेची अर्थव्यवस्था डबघाईला आणली आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे. सध्या देशाच्या बजेटच्या ७० टक्के भाग राजपक्षे कुटुंबाच्या नियंत्रणात आहे, असे देखील नागरिकांचे म्हणणे आहे.

राजपक्षे कुटुंबाविरोधात जाण्याचा कोणीही प्रयत्न केला तर त्याला मंत्रिपदावरून काढून टाकण्यात येत आहे. श्रीलंकेत निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे आणि परकीय चलनाच्या तुटवड्यामुळे मध्यवर्ती बँकेच्या प्रमुखाने आपला राजीनामा दिला आहे. श्रीलंकेमध्ये सध्या आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

सध्या श्रीलंकेमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा देखील तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच वैद्यकीय औषधे, वस्तू यांची देखील टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम रुग्णांना भोगावा लागत आहे. श्रीलंकन सरकारने जपान, चीन, भारत इत्यादी देशांकडून कर्ज घेतले आहे. तसेच श्रीलंकेमधील परकीय चलनाचा साठा देखील संपला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
मोठी बातमी! ‘हे’ कारण देत पालघर साधू हत्याकांडातील दहा आरोपींना उच्च न्यायालयाने दिला जामीन
‘युपीए’च्या अध्यक्षपदासाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा; मात्र प्रकाश आंबेडकरांनी सुचवलं ‘हे’ नाव!
‘जयश्री जाधव 50 हजार मतांनी निवडून येतील, कोल्हापुरात नमो नमो चालणार नाही’

ताज्या बातम्या आंतरराष्ट्रीय

Join WhatsApp

Join Now