केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राजस्थान लोक सेवा आयोगाच्या निवड समितीचे सदस्य, तसेच राजस्थान येथील कोटा टेक्निकल विद्यापीठाचे कुुलगुरू डॉ. रामअवतार गुप्ता यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ५ लाख रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले.
कोटा तांत्रिक विद्यापीठाच्या अखत्यारित तब्बल ३०० महाविद्यालय येतात. यातीलच एका महाविद्यालयात इंजिनीअरिंगच्या जागा वाढवण्यासाठी गुप्ता यांनी १० लाख रुपये लाचेची मागणी केली होती. दरम्यान, तक्रारदार व्यक्तीने राजस्थान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे व्हॉट्सअॅप वरुन तक्रार दिली होती.
त्यांनतर विभागाचे महासंचालक बीएल सोनी आणि अतिरिक्त महासंचालक दिनेश एमएन हे या कारवाईवर लक्ष ठेवून होते. दरम्यान त्यांनी सापळा रचून ५ लाखांची लाच स्विकारताना कुलगुरू गुप्ता यांना सरकारी विश्रामगृहातून रंगेहात पकडण्यात यश आले आहे.
भ्रष्टाचार विरोधी पथकाचे डीजी बीएल सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार,
आम्हाला मिळालेल्या तक्रारीच्या आधारे राजस्थान टेक्निकल यूनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. रामअवतार गुप्ता एका खासगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सीट वाढविण्यासाठी लाच मागत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सापळा रचण्यात आला आणि रामअवतार गुप्ता यांना पाच लाखांची लाच घेताना सरकारी गेस्ट हाऊसमधून रंगेहात अटक करण्यात आली आहे.
तसेच सरकारी विश्रामगृहात तपासादरम्यान गुप्ता यांच्या सुटमधून २१ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. यानंतर लाचलुचपत विभागाने कुलगुरु गुप्तांच्या जयपूर येथील खाजगी निवासस्थानी आणि कोटा येथील सरकारी निवासस्थानी देखील छापेमारी केली.
दरम्यान या छापेमारीत जवळपास त्यांच्या निवासस्थानी ३ लाख ६४ हजार रुपये रोख, तर ४५८ ग्रॅम सोने आणि ६.६९ किलो चांदी सापडली आहे. रामअवतार यांच्या पत्नीच्या नावे १८ बँक खाती आहे. त्यात जवळपास ६८ लाख रुपये आहेत. या सोबतच त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या जवळपास ७ बँक खात्यामध्ये १० लाख रुपये असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या नावावर एक मोठी जमिन, तर बायको आणि बहिणीच्या नावावर ११ फ्लॅट असल्याचे तपासात आढळले आहे. तसेच अजुनही गुप्ता यांच्या एचडीएफसी बँक खात्याच्या लॉकरची तपासणी बाकी आहे.
या प्रकरणी भ्रष्ट्राचार निवारण अधिनियम अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
पुन्हा लग्नबंधनात अडकणार UPSC टॉपर टीना डाबी, जाणून घ्या कोण बनणार नवरदेव
घरीच अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात UPSC पास; बीडच्या शेतकऱ्याची मुलगी राज्यात पहिली
IAS अधिकारी आहे की फिल्मचा हिरो; पर्सनॅलिटी पाहून 4 हजार तरुणींनी घातली लग्नासाठी मागणी, पाहा फोटो
नशीबाचा खेळ! मुलीने सरकारी नोकरीसाठी केली ६.७० लाखांची पुजा, पण मिळालीच नाही नोकरी