नुकताच आयफाचा २२ वा पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे. यावर्षी या पुरस्कार सोहळ्याचे आयाेजन अबुधाबीमध्ये करण्यात आले होते. या सोहळ्याला अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली होती. परंतु या सोहळ्यात सलमान खान, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राॅय-बच्चन या कलाकारांनी सगळ्यांचे लक्ष वेधुन घेतले.
कारण या सोहळ्यातील एक फोटो सोशल मीडीयावर चांगलाच धुमाकुळ घालत आहेे. या फोटोमध्ये सलमान खान आणि अभिषेक बच्चन हे एकाच फोटोमध्ये दिसत आहेत. तर या दोघांमध्ये संयुक्त अरब अमिरातीचे संस्कृती, युवा आणि सामाजिक विकास मंत्रालयाचे शेख नह्यैन बिन मुबारक अल नह्यैन बसलेले आहेत.
सलमान जरी ऐश्वर्यापासुन विभक्त झाला असला तरी तो अभिषेकच्या बाजुला बसला होता. त्यांचे हे फोटो सोशल मीडीयावर व्हायरल झाल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. या दोघांमध्ये सगळे काही ठीक झाले आहे का ? असा प्रश्न त्यांना पडला आहे. या फोटोवर नेटक-यांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.
दरम्यान, सलमान आणि ऐश्वर्या हे एकमेकांना १९९९ पासुन डेट करत होते. परंतु ते २००२ मध्येच वेगळे झाले. त्यावेळी सलमानने ऐश्वर्यासोबत गैरवर्तन केल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर विवेक ओबेराॅय आणि ऐश्वर्या एकत्र आले. परंतु हेही नाते जास्त वेळ टिकु शकले नाही. २००५ मध्ये ते वेगळे झाले.
अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी ढाई अक्षर प्रेम के या चित्रपटात काम केले. तिथूनच या दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली. पुढे ते धुम २ आणि कुछ न कहो या चित्रपटात एकत्र दिसले. त्यानंतर त्यांनी २००७ मध्ये लग्न केले. ऐश्वर्या ही लवकरच मोठ्या पडद्यावर आगमन करणार आहे. मणिरत्न दिग्दर्शित पोन्निनी सेल्वममध्ये ती काम करणार आहे.
अभिषेकचा नुकताच दसवी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तर तो आगामी एसएसएस-७ या चित्रपटात दिसणार आहे. तर सलमान खान हा कभी ईद कभी दिवाली, टायगर ३, बजरंगी भाईजान २ आणि पठाण या चित्रपटात दिसणार आहे.