Share

“उमेदवाराला विसरा, युद्धातून भारतीयांना मोदींनी वाचवलं त्यामुळं फक्त मोदींना मत द्या”

सध्या आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत. त्यामुळे अनेक पक्ष प्रचारसभा घेण्यात व्यस्त आहेत. त्यातच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात लोकांची मनं जिंकण्यासाठी भाजप पक्ष वेगवेगळी आश्वासने देताना दिसत आहे. नुकताच युक्रेन आणि रशिया युद्धाचा फायदा देखील प्रचारसभेत करून घेतला आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी भदोहीत केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावे मते मागितली आहेत. प्रचार करतेवेळी म्हणाल्या, मोदी सरकार युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय मुलामुलींना सुरक्षित मायदेशी आणत आहे.

रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. तिथं चौफेर हल्ले होतायत. सरकारचे चार मंत्री तिथे गेले असून नागरिकांना विमानात बसवून युद्धातून सुरक्षित वाचवून घरी आणत आहेत. यामध्ये भदोहीतील काही मुलांचा देखील समावेश आहे. सगळं काही मोदी आणि योगी यांच्यामुळे शक्य झाले.

तसेच म्हणाल्या तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये मतं देताना समोर उमेदवार कोण आहे हे पाहू नका. उमेदवाराला विसरून जा. मोदी आणि योगी यांनाच लक्षात ठेवून मत द्या. 2014, 2017 आणि 2019 मध्ये जसा विश्वास दाखवला तसा आत्ता देखील दाखवा. असे अनुप्रिया पटेल यांनी सांगितले .

म्हणाल्या, तुम्ही याआधी उत्तर प्रदेशला भक्कम असं सरकारं दिलं आहे. यावेळी देखील लक्षात ठेवा की निवडणुकीत तुम्ही केवळ उमेदवाराला मत देण्यासाठी जात नाही आहात, तर मोदींना मत देत आहात. उमेदवाराला विसरा, एनडीएच्या सरकारने तुमचं आयुष्य बदलण्यासाठी प्रत्येक गोष्ट केलीय. आमच्याकडे अनेक मोठ्या योजना आहेत. आम्ही उत्तर प्रदेशला नव्या युगात आणू.

अनुप्रिया पटेल यावेळी भाजपचे उमेदवार रविंद्र नाथ त्रिपाठी यांच्या प्रचारासाठी भदोहीत येथे आलेल्या होत्या. लोकांची मतं भाजपला मिळावीत यासाठी त्यांनी रशिया आणि युक्रेन युद्धात अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचे श्रेय घेत प्रचार केला. त्यामुळे येत्या काळात उत्तर प्रदेश जनता कोणत्या पक्षाला मत देईल याची चर्चा सर्वत्र होत आहे.

राजकारण

Join WhatsApp

Join Now