Share

पुणे हादरलं! गेल्या चार वर्षांपासून वडील, भाऊ, आजोबा, मामा करत होते ११ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

महाराष्ट्रात बलात्कारांच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. रोज कोणत्या ना कोणत्या भागातून महिलेवरील अत्याचाराच्या बातम्या समोर येत आहेत. आता देखील पुण्यातील ताडीवाला रोड येथे राहणार्‍या एका ११ वर्षाच्या चिमुकलीवर एकाच घरातील चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क येथील एका इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. या ११ वर्षीय चिमुकलीवर तिच्याच वडिलांनी, भावाने, आजोबांनी, आणि चुलत मामाने लैंगिक अत्याचार केले आहेत. याप्रकरणी एका समुपदेशक महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर पोलीसांनी आरोपींवर कारवाई केली आहे.

तसेच पिडित मुलीच्या वडिलांवर, आजोबांवर, चुलत मामावर आणि अल्पवयीन भावावर लैंगिक अत्याचाराच्या कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पिडित मुलगी कोरेगाव पार्कमधील एका शाळेत शिकत आहे. एके दिवशी तक्रार दाखल करणाऱ्या समुपदेशक महिला मुलींना ‘गुड टच, बॅड टच’ समजावून सांगण्यासाठी शाळेत गेल्या होत्या.

यावेळेस त्यांना या मुलीने आपल्यासोबत गेली चार वर्षे हे घाणेरडे कृत्य केले जात असल्याचे सांगितले. तसेच हे सर्व कृत्य घरातील माणसच करत असल्याचा देखील खुलासा तिने यावेळी केला. यानंतर समुपदेशक महिलेने यासंबंधी त्वरित पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार आता या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान २०१७ मध्ये पिडित मुलगी बिहारमध्ये असताना तिच्यावर वडिलांनी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर २०२० मध्ये मुलगी पुण्यात आल्यानंतर तिच्यावर तिच्याच लहान भावाने लैंगिक अत्याचार केले. इतकेच नव्हे तर, या भावाने तीला हे सर्व कोणाला न सांगण्याची धमकी दिली.

यातून मुलगी बाहेर पडत असतानाच २०२१ मध्ये तिच्यावर आजोबांनी आणि चुलत मामाने लैंगिक अत्याचार केले. हे सर्व मुलगी कोणाला काही न सांगता सहन करत होती. परंतु ज्यावेळी शाळेत समुपदेशक महिला या सर्व गोष्टींपासून बचाव करण्याची माहिती देण्यासाठी आल्या त्यावेळी मुलीने सर्व घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतरच हे सर्व प्रकरण उघडकीस आले आहे.

महत्वाच्या बातम्या
काश्मीर फाईल्सची रेकॉर्डब्रेक कामगिरी, आमिर खानच्या दंगलला मागे टाकत बाहुबली २ ला दिली टक्कर
..आणि डोळ्यादेखत मामेबहिणीसह भावाचा धरणात बुडून मृत्यू, पुण्यातील दुर्दैवी घटना
राऊतांच्या टीकेवर एमआयएमचा प्रतिहल्ला; म्हणाले, “शिवाजी महाराजांची मक्तेदारी फक्त तुमची आहे हे…”
मराठी बिग बॉस विनर विशाल निकमचे नशीब पुन्हा चमकले, ‘या’ मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now