Share

‘जवळपास दोन महिने मी नागपूरच्या झोपडपट्ट्यांमध्ये हिंडत होतो’, नागराज मंजुळेंनी सांगितला झुंडचा खडतर प्रवास

मुंबई | सध्या सगळीकडे दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या ‘झुंड’ चित्रपटाची चर्चा चालू आहे. ४ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी हि या चित्रपटाला भरभरून प्रेम दिले आहे. ‘झुंड’ या चित्रपटात बिग-बी अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. तर आपले आर्ची आणि परश्या देखील या चित्रपट झळकणार आहेत.

हा चित्रपट नागपुरातील समाजसेवक विजय बारसे यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. विजय बारसे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारी झोपडपट्टीतील मुलांची फुटबॉल टीम तयार केली. नागपुराच्या गल्लीबोळात जावून त्यांनी या मुलांना शोधून काढले होते. या आधारावरच हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.
विजय बारसे यांनी जशी या मुलांची टीम तयार केली तशीच टीम नागराज मंजुळे यांनी देखील आपल्या झुंड या चित्रपटासाठी शोधून काढली.

झुंड चित्रपटाच्या रिलीजनंतर नागराजने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या संवादात त्यांनी झुंड चित्रपटाच्या पडद्यामागील कहाणी सांगितली. झुंड चित्रपटाची टीम शोधण्यास त्यांना किती काळ लागला तसेच कशापद्धतीने त्यांना झुंड चित्रपटातील कॅरेक्टर सापडले असे अनेक किस्से त्यांनी सांगितले.

एका प्रसारमाध्यमांशी बोलतांना नागराज मंजुळे म्हणाले, मी कोणत्याही जातीला मानत नाही, त्यामुळे तुम्हीही मला कोणत्या जातीच्या बेडीत अडकवू नका. तसेच झुंड चित्रपटाबद्दल बोलताना त्यांनी चित्रपटातील कॅरेक्टरबद्दल सांगितले. तुमचे जे एक्सप्रेशन आहे तेच तुम्ही लिहिता. त्यानंतर त्याच पद्धतीचे लोक तुम्ही चित्रपटासाठी शोधात असता. माझ्या कथा आणि माझी पात्रे तशीच आहेत. म्हणून कास्टिंगही तसेच होते.

दरम्यान या चित्रपटाचे कास्टिंग नागराज मंजुळे यांचा भाऊ भूषण मंजुळे यांनी केले आहे. चित्रपटाच्या कास्टिंगची संपूर्ण जबादारी भूषण यांच्यावर होती. झुंड चित्रपटातील प्रत्येक कॅरेक्टर त्यांनी कसे शोधून काढले हे त्यांनी सांगितले. भूषण यांनी सांगितले, नागराजकडून जेव्हा स्क्रिप्ट ऐकली तेव्हाच डोक्यात नागपूर आणि विदर्भातली मुले आली.

कारण नागपूरची भाषा, त्यांची वागणूक, बोलण्याचा लय सगळे पाहता ते कलाकार नागपुरातील नसते तर चित्रपटात ती मजा आली नसती. त्यामुळे यासाठी नागपूरचे कलाकार घेतले असल्याचेही दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

पुढे भूषण यांनी चित्रपटातील बाबू कसा सापडला याबद्दल सांगितले. मी नागपुरात मुलांचा शोध घेत होतो तेव्हा रेल्वे ट्रॅकच्या बाजूला मला आठ वर्षांचा एक मुलगा चक्क दारू पिताना दिसला. मी त्याला हाक मारली तेव्हा तो तिथून निघून गेला त्यानंतर मी देखील त्याचा पाठलाग केला. रेल्वेट्रॅकच्या एका बाजूला गटार होती तिथे तो गेला. तिथेच मला बाबू आणि त्याचे मित्र दिसले.

मी त्यांना खोटे कारण दिले, रिसर्चसाठी कॉलेजमधून आलो आहे असे सांगितले. तेव्हा बाबूने मलाच दम दिला आणि “अपनी बस्ती को बदनाम नहीं करना.” असे सांगितले. त्यानंतर मी त्याला बाजूला नेवून त्याच्याशी गप्पा मारल्या त्यामुळे मला प्रियांशू ठाकूरमधला बाबू अधिकाधिक समजत गेला.

त्यानंतर त्यांनी चित्रपटातील मुख्य आणि महत्वाच कॅरेक्टर असलेल्या अंकुश मेशामचा उर्फ डॉनचा किस्सा सांगितला. भूषण यांनी सांगितले आम्हाला जवळपास सर्व मुले सापडली होती, मात्र डॉन सापडलाच नव्हता. त्यानंतर आम्ही नागपूरमधून परत निघालो त्यावेळी आम्ही असच गाडीतून फिरत होतो तो गणपती विसर्जनाचा दिवस होता.

गड्डी गोदामच्या भागातून मिरवणूक चालली होती आणि एक मुलगा मिरवणुकीसमोर नाचत होता. त्याला पाहून मी तिथेच थांबलो. अंकुश त्या मिरवणुकीत नाचत होता, त्याने डोक्यावर खोट्या केसांचा मोठ्ठा विग घातला होता. जर्सी-बर्मुडा घातला होता आणि नाचत होता त्याला बघत्याच क्षणी आम्हाला आमचा डॉन सापडला.

अंकुश हा खूप गरीब कुटुंबातील मुलगा होता. अंकुश वयाच्या दहाव्या वर्षापासून कुटुंबाला हातभार लावण्यासाठी लहानमोठी कामे करायचा. त्याच्या आयुष्यातील संघर्षाने त्याला पडद्यावरील डॉन साकारतांना मदत झाली. अंकुशला चित्रपटाविषयी अक्टिंग विषयी काहीच माहित नव्हते तरी त्याने उत्तमप्रकारे हे कॅरेक्टर निभावले.

अशा वेगवेगळ्या पद्धतीने नागराज आणि भूषणला त्यांच्या चित्रपटातील कॅरेक्टर सापडत गेले. आणि त्या मुलांमुळे झुंड या चित्रपटाल योग्य असे स्वरूप प्राप्त झाले. नागराजने या मुलांना नंतर पुण्याला आणले. तिथे महात्मा फुले सोसायटीमध्ये एक बंगला घेतला होता. तिथेच नागराज आणि त्यांच्या टिमसोबत ही मुले राहायला लागली. त्यानंतर त्यांचे तिथे वर्कशॉपही घेण्यात आले. अशा प्रकारे झुंड चित्रपटाला खरे स्वरूप प्राप्त झाले.

महत्वाच्या बातम्या:   

घाबरू नका, राज्यात भाजपला पुन्हा येऊ देणार नाही, पण..; राष्ट्रवादीच्या आमदारांना पवारांची ग्वाही 

ऐन सणासुदीला मोदी सरकारने लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना दिला धक्का, DA बाबत दिले स्पष्टीकरण

१०० कोटी वसुली प्रकरणाचा तपास पूर्ण, अनिल देशमुखांवरील आरोपांमध्ये तथ्य नाही; निर्दोष सुटका होणार

भगवंत मान यांच्या ऑफीसमध्ये फक्त भगतसिंग आणि आंबेडकरांचा फोटो; राष्ट्रपती, पीएमचा फोटो का नाही? काय आहे नियम?

 

 

 

इतर ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now