राजकारण (Politics): गेल्या पाच दिवसापासून पावसाळी अधिवेशन सुरु आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीचे आंदोलनही सुरु आहे. त्यामुळे विधानभवन परिसरात काही ना काही टीका टिपण्णी एकमेकांवर दररोज केली जात आहे. याआधी भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या आवारात आदित्य ठाकरे यांच्यावर घोड्याचे चित्र वापरून टीका केली आहे.
या टीकेला प्रत्युत्तर म्हणून आदित्य ठाकरे म्हणाले की, शिंदे गटाच्या आमदारांना विधिमंडळाबाहेर कसं उभं राहावं लागत आहे, काय घालावं लागत आहे. एका मंत्रिपदासाठी गद्दार सरकारमध्ये बंडखोरांना काय काय करावं लागत आहे. मला या सगळ्यांची खरोखरच कीव येते. हे सर्व ते प्रसारमाध्यमांसमोर बोलत होते. भाजप-शिंदे गटाच्या आमदारांकडून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे पोस्टर हातात घेऊन हे आंदोलन करण्यात आलं.
यावेळी ‘युवराजांची कायमच दिशा चुकली’, असं या पोस्टरवर लिहिलेलं होत. यावर आदित्य ठाकरे यांचा घोड्यावर उलट्या दिशेने बसलेला फोटोही आहे. वर एकीकडे हिंदुत्व आणि दुसऱ्या दिशेने महाविकास आघाडी दाखवण्यात आलं आहे. तर आदित्य हे हिंदुत्वाकडे पाठ करुन बसलेले आहेत, महाविकास आघाडीकडे त्यांचे तोंड आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, घरी जर यांच्यावर चांगले संस्कार केले असते तर आता यांनी गद्दारी केली नसती. यांना आता बिचाऱ्यासारखं उभं राहावं लागलं नसतं. पुढे ते म्हणाले, चला मी वरळीच्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. पण त्याअगोदर तुम्हीही राजीनामा देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरा, बघुयात कुणाची लोकप्रियता किती आहे.
शिंदे गटाच्या ४० आमदारांनीही त्यांचा राजीनामा द्यावा. विधानसभा विसर्जित करून संपूर्ण राज्यातच निवडणूक घ्या, असे म्हणत त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढण्याचे शिंदे गटाचे आव्हानही स्वीकारले. गद्दारांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आमच्याकडे काय कमी होती यांना? कोणताही मुख्यमंत्री सोडणार नाही, अशी खाती त्यांना दिली होती.
पण आम्हाला एकटं पाडण्यासाठी, आमच्यावर टीका करण्यासाठी या बंडखोर आमदारांना गळ्यात काय-काय घालून उभे केले जात आहे. आमदारांना सांगितले जात आहे की, आम्हाला एकटं पाडा, टीका करा, तर मंत्रिपदं मिळतील, म्हणून त्यांच्या सांगण्यावरून ते या गोष्टी करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
Abhijit Bichukle: स्वतःला राष्ट्रपती पदाचा दावेदार समजणाऱ्या अभिजीत बिचुकलेला बायकोने धू धू धुतलं
coffee With Karan: कियाराला शाहिद कपूरच्या कानाखाली मारायची होती पण.., कॉफी विथ करणमध्ये मोठा खुलासा
AAP: दिल्लीतही ऑपरेशन लोटस, आपचे ४० आमदार नाॅट रिचेबल; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मारली दांडी
ED : आतापर्यंत अनेकांना नोटीस देणाऱ्या ईडीलाच कोर्टाची नोटीस; वाचा काय आहे प्रकरण