Share

सरल वास्तुचे संस्थापक चंद्रशेखर गुरूंजीच्या हत्येचे फुटेज आले समोर, धक्कादायक माहिती उघड

‘सरल वास्तू’चे संस्थापक चंद्रशेखर अंगडी यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण कर्नाटक हादरले. चंद्रशेखर गुरुजींच्या हत्येच्या वेळेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यामध्ये दोन व्यक्ती त्यांच्या पाया पडून मग अचानक त्यांच्यावर हल्ला करताना दिसत आहेत.(Footage of the assassination of Saral Vastu founder Chandrasekhar Guruji came to light)

प्रेसिडेंट हॉटेलच्याजवळ गुरुजींवर आरोपींनी हल्ला करत चाकूने सपासप वार केले. त्या भयानक हल्ल्यात गुरुजी जखमी झाले. तेव्हाचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुजींचे अनुयायी म्हणून आलेल्या दोन व्यक्तींनी पहिल्यांदा त्यांना पाया पडून नमस्कार केला. मग अचानक त्यांच्यावर धारदार चाकूने वार करत त्यांची निर्दयी हत्या केली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तातडीने ते घटनास्थळी दाखल झाले.

त्यानंतर गुरुजींना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु त्यांचा मृत्यू झाला होता. गुरुजींची हत्या करणाऱ्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात आला. मंजुनाथ मालेवाड आणि महंतोश या दोन आरोपींना पोलिसांनी तपासादरम्यान रामदुर्ग येथून अटक केली आहे. या हत्येमागे कारण अजून समोर आलेले नाही.

अटक केलेल्या व्यक्तींकडून हत्येमागचे कारण शोधून काढण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. त्यामागे इतर कोणाचा हात आहे का? कोणत्या कारणानमुळे हत्या करण्यात आली? या सर्व गोष्टींचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे. मध्यंतरी पगारवाढी संदर्भात कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. त्या गोष्टीचा तर या घटनेमागे काही संदर्भ आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी चंद्रशेखर गुरुजींची ज्या अमानुषपणे हत्या झाली, त्याबाबत दुःख व्यक्त केले आहे. आरोपींना कठोर शिक्षा केली जाईल, असे त्यांनी म्हंटले. या संदर्भात कशा पद्धतीने कठोर शिक्षा पोलीसांकडून आरोपींना केली जाते, हे येणाऱ्या दिवसांत स्पष्ट होईल.

 

महत्वाच्या बातम्या- 

माझ्यासाठी ही देवी मांस आणि दारू स्विकारणारी आहे, माँ कालीच्या पोस्टर वादात महुआ मोईत्राची उडी 
बिस्कीट बनवणारी कंपनी ब्रिटानियाने घेतला मोठा निर्णय, नंतर मोठ्या प्रमाणात झाली शेअर्सची विक्री
स्वरा भास्करने केले महुआ मोइत्राचे केले समर्थन, ‘काली’च्या पोस्टवरून वाद घालणाऱ्यांना दिला ‘हा’ सल्ला 

 

 

 

ताज्या बातम्या इतर क्राईम राजकारण

Join WhatsApp

Join Now