Johnson & Johnson : भारतात अनेक लोक प्रसिद्ध जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या उत्पादनाचा वापर करतात. मुख्यतः लहान बाळांसाठी असलेले जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर हे मोठ्या प्रमाणात विकले जाते. मात्र, आता या बेबी पावडरबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे.
महाराष्ट्रात जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे. जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर तयार करण्याचा परवाना रद्द करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारचे अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच एफडीएने ही कारवाई केली आहे.
त्यामुळे महाराष्ट्रात यापुढे जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी बेबी पावडर तयार करून विकू शकणार नाही. जॉन्सन बेबी पावडरमुळे लहान मुलांच्या त्वचेला हानी पोहोचू शकते, असे एफडीएकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे कंपनीला हे उत्पादन बंद करण्यास सांगण्यात आले आहे.
मुलुंड, मुंबई, पुणे आणि नाशिक या ठिकाणांहून जॉन्सन बेबी पावडरचे नमुने तपासणीकरिता घेण्यात आले होते. तपासणीमध्ये या पावडरचा दर्जा निकृष्ट असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून या बेबी पावडरवर कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी भारतात बेबी पावडरची विक्री करत आहे. अनेक कुटुंबांमध्ये लहान मुलांसाठी हे पावडर वापरले जाते. तसेच जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी याव्यतिरिक्त बेबी शाम्पू, बेबी सोप आणि बेबी ऑइल यासारखी उत्पादनेदेखील घेत असते. या सर्व उत्पादनांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
मात्र, आता महाराष्ट्र्रात बेबी पावडरवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. तसेच या सगळ्याचा कंपनीला मोठा फटका बसला आहे.
महत्वाच्या बातम्या
Shivsena: तब्बल १२ वर्षे निष्ठेने काम करणाऱ्या नेत्याला ठाकरेंनी हाकललं, शिंदेंनी मध्यरात्री ३ वाजता….
Gold ring: ‘या’ दिवशी जन्मणाऱ्या बालकांना मिळणार सोन्याची अंगठी; भाजप नेत्याची घोषणा
Mahavikas Aghadi : ..तर राज्यात महाविकास आघाडी लोकसभेच्या ३५ जागा जिंकेल, भाजपला मिळतील फक्त १३ जागा
gulabrao patil : ‘पहाटेच्या शपथविधीवरुन अजितदादांनाही गद्दार म्हणायचं का?’, गुलाबराव पाटील लेट पण थेट बोलले