जेव्हापासून आलिया भट्टने (Alia Bhatt) सोशल मीडियावर आई होणार असल्याची खुशखबर जाहीर केली, तेव्हापासून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आता कपूर कुटुंबातील नव्या पाहुण्याची सर्वांना प्रतीक्षा आहे. रणबीर कपूर वडील आणि आलिया आई होणार असल्याच्या न्यूजनंतर आता ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतही आई होण्यासाठी उत्सुक आहे.(Alia Bhatt, Rakhi Sawant, Drama Queen, Adil Durrani)
अलीकडेच तिने पुन्हा ही इच्छा व्यक्त केली आहे. राखी सावंतने पुन्हा एकदा आई होण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. ‘ड्रामा क्वीन’चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने स्वतः पापाराझींसमोर हे व्यक्त केले आहे.
वास्तविक, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये राखी तिचा बॉयफ्रेंड आदिल खानसोबत हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसत आहे. तिथे पापाराझींनी त्यांना घेरले आणि आलियाच्या प्रेग्नेंसीबद्दल प्रश्न विचारले. तेव्हा राखीही तिची इच्छा व्यक्त करते आणि म्हणते, ‘मी कधी होणार आई?’
सध्या बॉलिवूडमध्ये लग्नानंतर लगेच गोड बातमी देण्याचा ट्रेंड आहे. त्यामुळे मलाही कधी एकदा आई होईन असं झालंय अशीही राखीने प्रतिक्रिया दिली. राखी तिच्या खास अंदाजात असंही म्हणाली, गर्भपात गुन्हा आहे, त्यामुळे लग्नाच्या आधीच जर मी गरोदर राहिले तर आदिलशी लग्न करून मी एक आदर्श बाळ जन्माला घालेन. माझ्या पोटी असं बाळ जन्माला यावं की ते या देशाचं कल्याण करेल. यावेळी राखी स्वत:ला राखी माँ असं म्हणायला विसरली नाही. आई होण्याची इच्छा व्यक्त करत जे काही बोलली त्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, राखी सावंत सध्या तिचा प्रियकर आदिल दुर्रानीसोबत राहत आहे. नुकतेच त्यांनी मीडियाशी बोलताना याची पुष्टी केली आहे. ती म्हणाली होती की हो, आदिल आणि मी एकत्र आहोत आणि एकत्र राहतो. आदिल लवकरच मुंबईला शिफ्ट होऊ शकतो. राखी सावंत सध्या आदिल दुरानी या बॉयफ्रेंडला डेट करत आहे. आदिलसोबत ती लवकरच लग्न करणार असल्याचं तिनं जाहीर केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
राखी सावंतच्या आरोपांवर रितेशनं सोडलं मौन, म्हणाला, माझे पैसै उडवत होती अन्
राखी सावंतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ; पाहून तुम्ही देखील पोट धरून हसाल
राखी सावंत आणि रितेशने घेतला घटस्फोट; कारण समोर आल्यानंतर चाहते झाले भावूक
फक्त ५० रुपयांसाठी राखी सावंत करायची हे काम, तिची स्ट्रगल स्टोरी वाचून तुम्हीही व्हाल भावूक