चारा घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या लालू प्रसाद यादव (lalu prasad yadav)यांना सीबीआय कोर्टाने दणका दिला आहे. चारा घोटाळा प्रकरणी राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. याचबरोबर लालू प्रसाद यांना ६० लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. (fodder scam lalu prasad yadav sentenced to five years in jail by cbi court)
या प्रकरणात दोषी आढळलेल्या आणखी ३७ जणांना शिक्षा सुनावण्यात येत आहे. दरम्यान, लालूप्रसाद यांच्या वकिलांनी लालूंना जामीन मिळावा म्हणून अर्ज करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, लालूंना जामीन न मिळाल्यास त्यांना तुरुंगातच राहावं लागणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे. तसेच स्पेशल कोर्टाचे न्यायाधीश एसके शशी यांनी हा आजचा निकाल दिला.
15 फेब्रुवारी रोजी सीबीआय न्यायाधीश एसके शशी यांच्या विशेष न्यायालयाने 21 फेब्रुवारी रोजी लालूंसह 38 दोषींना दोषी ठरवत शिक्षेवर सुनावणीची तारीख निश्चित केली होती. याशिवाय २४ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सध्या लालू यादव रांची रिम्समध्ये उपचार घेत आहेत.
तर दुसरीकडे विशेष सीबीआय न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना आयपीसीच्या कलम 409, 420, 467, 468, 471, कट रचण्याशी संबंधित कलम 120बी आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 12(2) अंतर्गत दोषी ठरवले आहे. 14 वर्षांची शिक्षा झालेल्या लालूप्रसाद यादव यांच्यासह 99 जणांविरुद्ध सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.
दरम्यान, चला जाणून घेऊ या नक्की हे प्रकरण काय? चारा घोटाळा पहिल्यांदा 1996 साली समोर आला. यामध्ये बिहारच्या पशुपालन विभागात करोडो रुपयांचा घोटाळ्याचा खुलासा झाला. 1990 ते 1997 दरम्यान लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना पशुसंवर्धन खात्याने बिहारच्या विविध जिल्ह्यात कोषागारातून कोट्यवधी रुपये अवैधरीत्या काढल्याचं आरोप आहे.
चारा घोटाळ्यात 3 वेगवेगळी प्रकरण असून तिन्हीही प्रकरणात लालू प्रसाद यादल आरोपी आहेत. सीबीआयने तपासात लालू प्रसाद यांना आधीच दोषी ठरवलं आहे. कोर्टाने दोषी ठरविल्यानंतर 2013मध्ये लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षाची शिक्षा सुनावली होती. लालू प्रसाद यादव यांचं लोकसभेचं सदस्यत्व काढून घेतलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
पिंपरी चिंचवडमध्ये Whats app वर सुरू होते सेक्स रॅकेट, एका रात्रीत २० हजार कमवत होत्या मुली
महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ भाऊ, उद्धव ठाकरे आणि आमचं अनेक विषयांवर एकमत- के चंद्रशेखर
मोठी बातमी! नारायण राणेंच्या बंगल्यावर होणार करावाई, महापालिका फिरवणार जेसीबी?
तुमच्या बुद्धीला ताण द्या आणि यामध्ये दडलेला आकडा सांगा, ९९% लोकं झालेत फेल