डेव्हिड वॉर्नर आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तान दौऱ्यामुळे सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळू शकला नसला तरी या सिजनमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-5 फलंदाजांमध्ये त्याचा समावेश होतो. वॉर्नरशिवाय दिल्लीसाठी एकाही फलंदाजाला सलग धावा करता आल्या नाहीत.(focus-on-the-party-than-practice-arguing-with-the-players-sehwags-serious-allegations-against-warner)
वॉर्नरने(David Warner) 2009 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून(Daredevils) आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. 2013 पर्यंत तो संघाचा भाग होता. वॉर्नरला 2014 च्या लिलावात सनरायझर्स हैदराबादने विकत घेतले होते. त्यानंतर तो 8 वर्षे संघाचा भाग होता. आता पुन्हा एकदा तो दिल्लीकडून खेळत आहे.
2019 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्यांचे नाव बदलून दिल्ली कॅपिटल्स(Delhi Capitals) केले. डेव्हिड वॉर्नरने जेव्हा आयपीएल करिअरला सुरुवात केली तेव्हा वीरेंद्र सेहवाग त्याचा कर्णधार होता. आता सेहवागने वॉर्नरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल बरेच खुलासे केले आहेत.
वीरेंद्र सेहवाग(Virender Sehwag) म्हणतो की, सुरुवातीला वॉर्नरने खेळाकडे फारसे लक्ष दिले नाही. तो म्हणाला, ‘मी माझी निराशा काही खेळाडूंवर काढली आहे आणि डेव्हिड वॉर्नर त्यापैकी एक होता. कारण नवीन असताना त्यांचा सराव किंवा मॅच खेळण्यापेक्षा पार्टी करण्यावर जास्त भर असायचा.
पहिल्या वर्षी त्याचे काही खेळाडूंशी भांडणही झाले होते, त्यामुळे आम्ही त्याला शेवटच्या दोन सामन्यांसाठी परत पाठवले होते. कधी कधी असं होतं की तुम्ही एखाद्याला धडा शिकवण्यासाठी बाहेर ठेवता.’
भारताचा माजी सलामीवीर पुढे म्हणाला, ‘तो नवीन होता आणि त्यामुळे त्याला हे दाखवणे आवश्यक होते की तुम्ही संघात एकटे नाही, इतरही आहेत. इतर खेळाडू आहेत जे संघासाठी सामने खेळू शकतात आणि जिंकू शकतात आणि हेच घडलं. आम्ही त्याला संघाबाहेर ठेवले आणि जिंकलो.