Share

फुले दाम्पत्याचा संघर्ष मोठ्या पडद्यावर; ‘हा’ प्रसिद्ध बाॅलीवूड अभिनेता साकारणार ज्योतीबांची भूमिका

बॉलिवूडने आजपर्यंत अनेक महान व्यक्तींच्या जीवनावर उत्तम चित्रपट बनवले आहेत, आणि त्यांची कथा, संघर्ष लोकांपर्यंत पोहोचवला आहे. लोकांना या प्रकारच्या चित्रपटामुळे मोठी प्रेरणा मिळते. आता अशाच व्यक्तीची एक कथा चित्रपटाच्या रुपात प्रदर्शित होणार आहे. ती कथा असणार आहे, महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांची.

लेखक, अभिनेता दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी नेहमीच सामाजिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील आणि वेगळ्या कथा मनोरंजक पद्धतीनं प्रेक्षकांसमोर मांडल्या आहेत. आता ते अशीच एक सामाजिक कथा लोकांसमोर मांडणार आहेत. ते महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपुढे मांडणार आहेत.

महात्मा ज्योतीराव फुले यांच्या 195 व्या जयंतीनिमित्त आज 11 एप्रिलला चित्रपटाच्या फर्स्ट लुकचं अनावरण करण्यात आलं. चित्रपटाचे नाव ‘फुले’ असे आहे. याचे दिग्दर्शक अनंत महादेवन असून, हा हिंदी चित्रपट हिंदी भाषेत असणार आहे. या चित्रपटात अभिनेता प्रतीक गांधी आणि अभिनेत्री पत्रलेखा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या भूमिका साकारणार आहेत.

या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज होताच, लोकांची उत्सुकता वाढली आहे. पोस्टर मध्ये प्रतीक आणि पत्रलेखा हुबेहूब ज्योतीरावांसारखं आणि सावित्रीबाई यांच्यासारखे दिसत आहेत. दोघांनाही महान व्यक्तींची भूमिका साकारण्यास मिळाली याबद्दल दोघेही खुश आहेत.

चित्रपटाबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना प्रतीक म्हणाला, फुले हा माझ्या करिअरमधील पहिला बायोपिक आहे. त्यांच्यासारखं प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व मोठ्या पडद्यावर साकारणं हे माझ्यासाठी खूप मोठं आव्हान आहे. हे माझं ड्रीमरोल असून त्याच्या शूटिंगसाठी मी खूप उत्सुक आहे. चित्रपटाची पटकथा ऐकल्यानंतर मी लगेचच होकार कळवला होता.

दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी याआधी ‘मी सिंधुताई सपकाळ’, ‘गौर हरी दास्तान’ आणि ‘बिटरस्वीट’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. आता राज किशोर खावरे, प्रणय चोक्शी, सौरभ वर्मा, उत्पल आचार्य, अनुया कुडेचा आणि रितेश कुडेचा निर्मित ‘फुले’ हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now