Share

जोरात टॉयलेटला आली म्हणून मैदानातून काढला पळ, ‘या’ खेळाडूमुळे थांबवावा लागला सामना, पहा व्हिडीओ

सध्या आयपीएलचा 15 वा सिझन सुरू आहे. क्रिकेटच्या मैदानात अशा अनेक घटना घडतात, जो प्रचंड चर्चेचा विषय ठरतो. आता नुकताच गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना पार पडला. या सामन्यात घडलेल्या एका गोष्टीची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे.

आयपीएल मध्ये शुक्रवारी पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात टक्कर झाली, ज्यामध्ये गुजरातने बाजी मारली. यात गुजरातच्या विजयाचा हिरो राहुल तेवतिया ठरला. त्याने शेवटच्या 2 चेंडूत 2 षटकार खेचत संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला.

या सामन्यात 20 वर्षीय फलंदाज साई सुदर्शननेही गुजरातकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. साईने 30 चेंडूत 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. मात्र सामन्यादरम्यान त्याला विचित्र परिस्थितीला सामोरे जावे लागले. यामुळे त्याला मधल्या षटकात मैदानाबाहेर जावे लागले. गुजरातच्या डावातील 8 वे षटक संपल्यानंतर ही घटना घडली.

https://twitter.com/cric_big_fan/status/1512476031550074884?t=A5c5hBofaWJlLvFgTAcw4Q&s=19

शुभमन गिलसोबत फलंदाजी करणाऱ्या साई सुदर्शनने अचानक मैदान सोडले. त्यामुळे काही काळ खेळ थांबवावा लागला. त्यानंतर समजले की साई सुदर्शनला खेळताना अचानक टॉयलेट लागली, त्यामुळे तो मैदानातून बाहेर पडला. खेळ थांबवण्यात आले तेव्हा सुरुवातीला वाटले की, गुजरातने टाइम आऊट घेतला आहे.

नंतर मैदानात गोंधळ उडल्यावर कॉमेंट्री करत हर्षा भोगले यांनी साई सुदर्शन टॉयलेटला गेल्याचं सांगितले. त्यामुळे खेळाडू सहित प्रेक्षकांना देखील आश्चर्य वाटले. मैदानात या गोष्टीचा हशा झाला. सध्या सोशल मीडियावर साई सुदर्शन च्या या प्रकरणाची प्रचंड चर्चा सुरू आहे.

पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त विजय शंकरच्या जागी साई सुदर्शनला गुजरात टायटन्सकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने 30 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 35 धावा केल्या. यादरम्यान त्याने शुभमन गिलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारीही केली. त्याच्या खेळीच्या जोरावर गुजरातने शेवटच्या षटकात 190 धावांचे लक्ष्य गाठले.

खेळ

Join WhatsApp

Join Now