आज सकाळी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील (Mumbai-Pune Express way Accident) भीषण अपघात झाला आहे. मावळ तालुक्यातील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिलाटणे गावाजवळ कार कंटेनर यांच्यात भीषण अपघात झालाय. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. (five people died in major accident between pune mumbai highway)
धक्कादायक बाब म्हणजे या भीषण अपघातामुळे एकच खळबळ उडाली असून यामध्ये कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या कारवरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. कार्ला फाटा सोडल्यानंतर रस्त्याच्या मध्ये असणारे दुभाजक ओलांडून मुंबईच्या दिशेने जाणार्या कंटेनरखाली ही कार घुसली.
या भीषण अपघातात कारमधील सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ही कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने येत असताना कारचालकाचं कारवरचं नियंत्रण सुटलं. शिलाटणे गावाजवल महामार्गावर ही कार दुभाजक ओलांडून पलीकडच्या दिशेला गेली.
चिंतेची बाब म्हणजे कारचा वेग इतका होता की समोरून येणाऱ्या कंटेनरच्या खाली ही कार घुसली. प्रवासी नेमके कोण आहेत? कुठं निघाले होते? याबाबतची माहिती लोणावळा पोलिसांकडून मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झालेली आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती समजताच महाराष्ट्र सुरक्षा बल, आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, स्थानिक ग्रामस्त, पोलीस यंत्रणा यांनी घटनास्थळी दाखल झाले. तसेच कंटेनरखाली अडकलेली गाडी आणि मृत प्रवाशी यांना बाहेर काढले. सध्या मृतांची ओळख पटलेली नाहीये.
महत्त्वाच्या बातम्या
नोकरीची चिंता सोडा आणि सुरू करा मखानाची शेती, सरकारकडून अनुदान मिळवा, कमवा लाखो
या 4 पेनी स्टॉक्सने दिलाय छप्परफाड परतावा, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत का ‘हे’ स्टॉक्स
‘पैसा खर्च करण्यासाठी आणि पार्टी करण्यासाठी मी लग्न केलंय’, अंकिता लोखंडेने सांगितले कारण
वाईन व दारूत फरक आहे असं सरकारचं म्हणणंय मग वाईन पिऊन गाडी चालवल्यावर दंड घेणार का?