Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करत भाजपसोबत आपले सरकार स्थापन केले. त्यानंतर एक महिन्यानंतर शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. मंगळवारी विधानभवन येथे मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा संपन्न झाला.
यात शिंदे गटाचे ९ आणि भाजपचे ९ अशा एकूण १८ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, यावेळी सर्व महत्वाची खाती भाजपकडे येणार असून शिंदे गटाला जुनीच खाती मिळणार असल्याची सर्वत्र चर्चा आहे. या मंत्रिमंडळ विस्तारावर विरोधी पक्षाकडून जोरदार टीकाही होत आहेत.
मात्र, शिंदे गटातील ज्या आमदारांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळाली नाही ते अनेक आमदार नाराज झाले आहेत. तसेच त्यांच्यामध्ये अंतर्गत धुसफूस सुरु आहे. या मंत्र्यांना शांत करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना करावा लागला.
नाराज झालेल्यांना शांत करण्यासाठी ‘मी दिलेला शब्द पाळणार आहे, थोडे सबुरीने घ्या’ असे आवाहन एकनाथ शिंदे यांना करावे लागले. शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी होणार असल्याचे जाहीर झाले. त्यानंतर शिवसेनेतील बंडाच्या वेळी मंत्रीपदाचे आश्वासन मिळालेल्या शिंदे गटातील अनेक आमदारांना मंत्रिमंडळात आपले नाव आहे का याची उत्सुकता लागली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पहाटेपर्यंत मंत्रिमंडळातील नावे अंतिम केली. परंतु शिंदे गटातून केवळ नऊ जणांना शपथ देण्यात येणार असल्याचे कळल्यानंतर नाराजी पसरली. शिंदे गटातील बंडखोर आमदारांपैकी संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, बालाजी किणीकर, बच्चू कडू, आशीष जयस्वाल इत्यादींना मंत्रीपदाची संधी न मिळाल्याने ते नाराज झाले असल्याचे सांगितले जात आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या शपथविधीच्या आधी शिंदे गटाच्या आमदारांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलावण्यात आली होती. शिवसेनेतील शिंदे गटातील आमदारांबरोबरच त्यांना सहकार्य करणाऱ्या छोट्या पक्षांचे व अपक्ष आमदारदेखील या बैठकीला उपस्थित होते. छोटे पक्ष व अपक्ष यांना मंत्रीपदाची संधी द्यावी लागेल. मागच्या मंत्रिमंडळात आम्ही मंत्री होतो. आता तो आमचा अधिकार आहे, अशी भावना बच्चू कडू यांनी व्यक्त केली.
यावेळी एकनाथ शिंदे नाराज आमदारांना म्हणाले की, मंत्रिमंडळाचा पुन्हा विस्तार होणार आहे. त्यावेळी आपल्या गटाला आणखी दोन-तीन कॅबिनेट मंत्री पदे आणि पाच सहा राज्यमंत्रीपदे मिळणार आहेत. त्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळेल.
बंडाच्या सुरुवातीपासूनच भरत गोगावले हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याने त्यांना मंत्रिपद मिळेल असे सर्वांना वाटत होते. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे भरत गोगावले यांना एकनाथ शिंदेंनी आपल्या गाडीतून घेऊन जात त्यांचा सन्मान करत असल्याचा संदेश देत गोगावले यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. तसेच या नाराज आमदारांचा मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्तारात समावेश न झाल्यास शिंदे गटात बंड होण्याची शक्यता वर्तविली जाते.
महत्वाच्या बातम्या
Tata punch : टाटाच्या ‘या’ स्वस्त कारने घातला धुमाकूळ, ओलांडला १ लाखांचा टप्पा, किंमत 6 लाखांपेक्षा कमी
Arjun Kapoor: अजुनतरी मलायकासोबत लग्नाचा विचार केला नाही कारण.., अर्जुन कपूरने केला मोठा खुलासा
Sunil raut : ..त्यानंतर ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून हटवणाऱ्यांचा सुड घेणार, राऊतांच्या इशाऱ्याने खळबळ
राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर, अजूनही बेशुद्ध अवस्थेत, समोर आली महत्वाची अपडेट