मुंबईमध्ये पहिल्यांदाच एका ‘गे’ सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणात मालवणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. ही सेक्स रॅकेट चालवणारी टोळी ऑनलाइन डेटिंग ‘गे’ अँपचा वापर करत होती. या कारवाईनंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात मालवणी पोलिसांना एका व्यक्तीची तक्रार आली होती. अनेक महिन्यांपासून ‘ग्राइंडर’ या गे अँपच्या माध्यमातून ऑनलाईन डेटिंग गे सेक्स रॅकेट चालवण्यात येत होते. या टोळीतील काही जण लोकांना लुटायचे आणि व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करून पैसे उकळायचे, अशी माहिती मालवणी पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणाची माहिती देताना मालवणीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हसन मुलाणी यांनी सांगितले की, आम्हाला एका व्यक्तीकडून तक्रार मिळाली होती. त्या व्यक्तीला पाच जणांनी धमकावून त्याच्याकडून रोख रक्कम आणि एटीएम कार्ड हिसकावले होते. आरोपीने पीडित व्यक्तीचे आक्षेपार्ह व्हिडिओही सोशल मीडियावर टाकले होते.
अँप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये संपूर्ण माहिती भरली जाते. त्यानंतर ठिकाणच्या माहितीनुसार सर्व समलिंगी मुलं एकमेकांशी जोडली जातात. आधी ते चॅटवर बोलायचे आणि नंतर एकत्र अनैतिक संबंध ठेवायचे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी इरफान फुरकान खान, अहमद फारुकी शेख आणि इम्रान शफिक शेख या आरोपींना अटक केली आहे.
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांकडून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या सेक्स रॅकेटच्या ग्राहकांमध्ये हायप्रोफाईल लोकांचाही समावेश असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. आरोपींना अटक केल्यानंतर पोलीस त्या हायप्रोफाईल ग्राहकांवरही कारवाई करू शकतात, असे मानले जात आहे.
मिळालेलंय माहितीनुसार, आरोपींनी एका कंपनीच्या अकाउंटंटला गे डेटिंग अँपच्या माध्यमातून गंडा घातला होता. त्याच्याकडून तासाला एक हजार रुपयांची मागणी करण्यात आली. सर्व काही ठरल्यानंतर पीडित व्यक्तीने दिलेल्या पत्त्यावर पोहोचल्याचे सांगण्यात आले. तो तेथे पोहोचला तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या पाच जणांनी त्याला बेदम मारहाण केली. त्याचा फोन, पर्स आणि एटीएम हिसकावून घेतले. आरोपींनी त्याला धमकावून पिन कोडही शोधून काढला. नंतर पीडित व्यक्तीचा व्हिडिओ बनवला आणि तो इंटरनेटवर टाकण्याची धमकी दिली.
महत्वाच्या बातम्या :-
‘लागिरं झालं जी’मधील कलाकारांचे आवाहन; ‘त्या’ बातम्या म्हणजे अफवाच, त्यावर विश्वास ठेवू नका
मुंबई पोलिसांकडून ‘गे’ सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, अश्लील व्हिडिओ बनवून करायचे ब्लॅकमेल
फक्त २ खोल्यांच्या घरात राहतात रतन टाटांचे भाऊ; का जगतात असे सामान्य आयुष्य माहितीये का?