मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लवकरच एका नव्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘व्हिक्टोरिया’ (Marathi Movie Victoria )असे या चित्रपटाचे नाव असून नुकतीच चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक शेअर केला आहे.
सोनाली कुलकर्णीने इन्स्टाग्राम हँडलवर तिच्यासोबत ‘व्हिक्टोरिया’ चित्रपटातील इतर कलाकारांचाही फर्स्ट लूक शेअर केला आहे. यामध्ये अभिनेता पुष्कर जोग आणि आशय कुलकर्णी यांचाही फर्स्ट लूक दिसून येत आहे. तसेच सर्वांच्या चेहऱ्यावर जखमी खुणा दिसून येत आहेत. फर्स्ट लूक शेअर करत सोनालीने लिहिले की, ‘प्रत्येक रहस्य कधी ना कधीतरी उलगडतंच! व्हिक्टोरियाच्या या जगात स्वागत आहे’.
सोनालीसोबत पुष्कर जोग, आशय कुलकर्णी, विराजस कुलकर्णी यांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. तर त्यांच्या या पोस्टवर त्यांचे चाहते कमेंट करत त्यांना शुभेच्छा देत आहेत. ‘व्हिक्टोरिया’ हा चित्रपट एक हॉररपट असून यामधील कलाकारांचा फर्स्ट लूक पाहून चित्रपटाचे कथानक काय असेल आणि त्यात काय पाहायला मिळेल याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
‘व्हिक्टोरिया’ या चित्रपटाचे दिग्दर्शन जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांच्याद्वारे करण्यात येत आहे. या चित्रपटाद्वारे दोघेही दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. विराजस कुलकर्णी हा मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. यापूर्वी त्याने अनेक नाटक आणि लघुपटांचे दिग्दर्शन केले. मात्र, व्हिक्टोरियाद्वारे तो पहिल्यांदाच चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.
आनंद मोशन पिक्चर्स आणि गुसबम्प्सद्वारे सादर या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित, रूपा पंडित आणि पुष्कर जोग करत आहेत. तर वैशल शाह सह-निर्माता आहेत. तसेच चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद ओमकार गोखले, जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांनी लिहिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
श्वेता तिवारीचे वादग्रस्त वक्तव्य; अंडरगारमेंटला देवाशी जोडले, म्हणाली, ‘देव माझ्या ब्रा ची…’
खऱ्या आयुष्यातील बजरंगी भाईजान, आतापर्यंत ६०० हून जास्त बेपत्ता मुलांना पोहोचवलंय घरी
..त्यामुळे अभिनय सोडून बॉबी देओलला करावे लागले नाईट क्लबमध्ये काम, कठीण काळात पत्नीने दिली साथ