मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांच्या लग्नाला (Mitali Mayekar And Siddharth chandekar Marriage) सोमवारी एक वर्ष पूर्ण झाले आहे. २४ जानेवारी रोजी पुण्यातील ढेपे वाड्यात त्यांचा पारंपारिक ढंगातला खास विवाहसोहळा पार पडला होता. कुटुंबीय, मित्रमंडळी आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत ते दोघे विवाहबंधनात अडकले होते. तर आता त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सिद्धार्थ आणि मितालीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या या नवीन आयुष्याची सुरुवात करणाऱ्या दिवसाची आठवण काढली आहे.
सिद्धार्थने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर लग्नातील मितालीसोबतचे त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने लिहिले की, ‘माझ्या आयुष्यातील सर्वात क्युट बाळांना लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा’. तसेच त्याने मितालीचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. यामध्ये मिताली लग्नादरम्यान खूप मजामस्ती करत असल्याचे दिसून येत आहे. तसेच व्हिडिओत सिद्धार्थ उखाणा घेताना दिसून येत आहे.
व्हिडिओ शेअर करत सिद्धार्थने लिहिले की, ‘एका वर्षापूर्वी या स्टॅच्यू ऑफ ड्रॅमॅटिक लिबर्टीसोबत मी लग्न केलं. तेव्हापासून माझ्या आयुष्यात अनेक उलथपालथ झाले. इतकं नाटक मी या जगात कुठेही पाहिलं नाही. पण माझ्या आयुष्यात माझ्यासोबत ही ‘tiny’ असल्याने मी धन्य आहे. आय लव्ह यू मिताली मयेकर.’
दुसरीकडे मितालीनेही लग्नादरम्यानचे सिद्धार्थसोबतचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत त्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सिद्धार्थ आणि मितालीच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करत त्यांना लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शुभेच्छा देत आहेत. तसेच त्यांच्या भावी आनंदी आयुष्यासाठीही शुभेच्छा देत आहेत.
नुकतीच मिताली आणि सिद्धार्थने त्यांची लग्नानंतरची पहिली मकरसंक्रात साजरी केली होती. यावेळी सिद्धार्थ आणि मिताली काळे कपडे आणि हलव्याच्या दागिन्यात दिसून आले. दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर त्यांच्या मकरसंक्रातीदरम्यानचे फोटो शेअर केले होते. त्यांच्या या फोटोंनाही चाहत्यांची फारच पसंती मिळाली होती.
मितालीने ‘उर्फी’ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर झी युवावरच्या ‘फ्रेशर्स’, ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेतही मितालीने काम केले आहे. ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेतील कस्तुरी या भूमिकेद्वारे मितालीने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. तर दूसरीकडे सिद्धार्थनेही ‘गुलाबजाम’, ‘क्लासमेट’ यांसारखे अनेक चित्रपट तसेच ‘अग्निहोत्र’, ‘प्रेम हे’ यांसारख्या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
PHOTO: थाटामाटात पार पडला अलका कुबल यांच्या मुलीचा लग्नसोहळा, दिग्गज कलाकारांनी लावली हजेरी
वरूण धवन-नताशा दलालच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण; अभिनेत्याने शेअर केले खास फोटो
वामिकाचे फोटो व्हायरल झाल्याने विराट-अनुष्का त्रस्त; पोस्ट शेअर करत म्हणाले, आम्ही विनंती…