Share

मोठी बातमी! मुंबईत LIC ऑफिसमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या ८ गाड्या पोहोचल्या

LIC
राज्यात आगीच्या घटना अलीकडे मोठ्या प्रमाणात घडताना पाहायला मिळत आहे. काल दुपारच्या नवी मुंबईतील कंपन्यांना सुमारास लागलेली तब्बल आग तब्बल आठ तासानंतर आटोक्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, या आगीत दोन कामगार बेपत्ता झाले असून तिघे गंभीर जखमी आहेत.

ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा मुंबई आणखी एक घटना घडली आहे. मुंबईतील विलेपार्ले पश्चिम येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) कार्यालयाला भीषण आग लागली आहे. याबाबत मिळलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या पोहोचल्या असल्याची माहिती मिळत आहे.

दिलासादायक बाब म्हणजे सकाळची वेळ असल्याने इमारतीत जास्त कर्मचारी नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र  आगीत महत्वाची कागदपत्रं जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे. याचबरोबर आता आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

मात्र ही आग नेमकी कशी लागली याची अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. सध्या तरी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या दुर्घटनेमुळे एलआयसी कार्यालय परिसरात काही काळासाठी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

याचबरोबर शुक्रवारी नवी मुंबईतील पावणे एमआयडीसी परिसरात भीषण आग लागली. दुपारी लागलेली आग आठ तासानंतर आटोक्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी हजर झाल्या होत्या. या आगीत दोन कामगार बेपत्ता झाले असून तिघे गंभीर जखमी आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कंपन्यांकडे केमिकलचे ड्रम असल्याने हे ड्रम फुटत असून मोठी आग भडकत होती. सुरुवातीला ही भीषण परिस्थिती आटोक्यात आणणे अशक्य झाले होते. त्यानंतर अग्निशमन दलाने सर्व यंत्रणा वापरून बाहेरून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.

महत्त्वाच्या बातम्या
मुख्यमंत्री पदासाठी अडून बसलेले उद्धव ठाकरे म्हणतात, ‘मुख्यमंत्री बनणे हे माझं स्वप्न कधीच नव्हतं, पण…’
VIDEO: उर्वशी रौतेलाचा बाथरूममधील व्हिडीओ झाला लीक, सोशल मिडीयावर उडाली खळबळ
कॅमेऱ्याजवळ येताच उप्स मोमेंटची शिकार झाली दिपीका पादूकोन, गाडीतून उतरताच.., पहा व्हिडीओ
शाहरूख खानसोबतच्या भांडणावर पहिल्यांदाच अजय देवगनने सोडले मौन, म्हणाला, आम्ही दोघं..
इतर क्राईम ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now