राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन सुमारे 2 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या दोन वर्षात सत्ताधारी शिवसेना पक्षातील नेत्यांकडून होणाऱ्या दादागिरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे सत्ताधारी पक्षातील नेत्यांना सत्तेचा माज आलाय का? असा सवाल सध्या राजकीय वर्तुळात उपस्थित झाला होता. (fir lodged against ramesh bornare for beating sister in law jayashree bornare crime)
अशातच आता शिवसेना आमदार रमेश बोरनारे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर (Vaijapur) याठिकाणी एका शिवसेना आमदाराने आपल्या कुटुंबीयांशी मिळून भावजयीस बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना वैजापूर येथे शुक्रवारी गोदावरी काॅलनी परिसरात घडली.
या प्रकरणी आमदार बोरनारे यांच्यासह दहा जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी वैजापूर तालुक्यातील सटाणा येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते भाजपा शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्या चुलत भावाची पत्नी जयश्री दिलीप बोरनारे या पतीसोबत हजर होत्या.
तेथे त्यांनी डॉ. कराड व माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांचा सत्कार केला. हा सत्कार बोरनारे कुटुंबीयांच्या जिव्हारी लागला. यावरून आमदार बोरनारे यांच्या कुटुंबीयांनी भावजयीस लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, कार्यक्रमात अचानक आमदार व त्यांचे भाऊ महिलेला मारहाण करत असल्याचे बघून जमलेले पाहुणे अचंबित झाले. यानंतर पती, पत्नीने थेट वैजापूर पोलिस ठाणे गाठले. वैजापूर पोलिस ठाण्यात गैरकायद्याची गर्दी जमवून शिविगाळ व मारहाण केल्याप्रकरणी १४३, १४७, ३२३, ५०४, ५०६ या कलमान्वये दहा जणांवर गुन्हा दाखल झाला.
या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. एका आमदारानेच आपल्या भावजयीला मारहाण केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पक्षातील नेत्यांना सत्तेचा माज आलाय का? असा सवाल सध्या उपस्थित होतं आहे. तसेच या घटनेमुळे विरोधकांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
भयानक! शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या तीन शिवप्रेमींचा अपघात, २०० फुट दरीत कोसळली मोटारसायकल
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ च्या चाहत्यांना धक्का, ‘या’ कारणामुळे लवकरच मालिका होणार बंद?
“शाळेत जय माता दीचा दुपट्टाही नाही चालणार आणि..”, कंगना राणावतने पुन्हा हिजाब वादावर दिली प्रतिक्रिया
हजारो लोकांना ऍसिडमध्ये बुडवून मारणारा कुख्यात गँगस्टर जेलमधून सुटला, १० वर्षांपासून भोगत होता शिक्षा