Share

Bachchu Kadu : रवी राणा आणि बच्चू कडूंच्या वादात मोठा ट्विस्ट, ‘या’ कारणामुळे बच्चू कडूंवर गुन्हा दाखल

bachchu kadu

fir file agaist bachchu kadu  | गेल्या काही दिवसांपासून अपक्ष आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात वाद सुरू आहे. बच्चू कडू यांना प्रत्येक ठिकाणी पैसे लागतात, त्यांनी बंडखोरी करण्यासाठी सुद्धा पैसे घेतले होते, असा आरोप रवी राणा यांनी केला होता. त्यानंतर बच्चू कडू यांनी अमरावतीत पत्रकार परिषद घेत रवी राणा यांना सुनावले आहे.

पत्रकार परिषदेमध्ये बच्चू कडू खुप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. एका बापाची अवलाद असाल, तर माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे द्या, असे आव्हान बच्चू कडू यांनी दिले होते. पण बच्चू कडू यांची ही आक्रमकता त्यांच्याच अंगलट येताना दिसून येत आहे.

एका बापाची अवलाद हा शब्दप्रयोग केल्यामुळे बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या प्रकरणाला एक वेगळे वळण लागल्याचे दिसून येत आहे. त्या वक्तव्यामुळे बच्चू कडू यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मी जर गुवाहटीला जाण्यासाठी पैसे घेतले असतील, तर ते कोणी दिले असतील? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल बोललं पाहिजे. आम्ही गुवाहटीला गेलो म्हणून मंत्रिपदासाठी तुम्ही रांगेत उभे राहिले, असे बच्चू कडू यांनी म्हटले होते.

तसेच आम्ही गुवाहटीला गेलो म्हणून तुम्ही बदनामी करायची, हे चालणार नाही. माझी लढाई शांततेची आहे. पण जास्त अंगावर आला तर आरपारची लढाई करु. एक बापाची अवलाद असाल, तर माझ्यावर केलेले आरोपांचे १ तारखेपर्यंत पुरावे द्या, असे बच्चू कडू यांनी म्हटले होते. त्यामुळे आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

बच्चू कडू यांचे हे वक्तव्य महिला आणि तृतीय पंथियांच्या भावना दुखवणारे आहे, असे म्हणत बच्चू कडूंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावतीच्या राजापेठ पोलिस ठाण्यात महिला मुक्ती मोर्चाने हा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता नक्की पुढे काय होणार याकडे सर्वाचे लक्ष लागलेले आहे.

महत्वाच्या बातम्या-
Pune- satara : अब्बा उठो ना मम्मी से बात करो…; कार अपघातात वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर मुलगा ढसाढसा रडला
Aditya Thackeray : जो माणूस निवडणूकीला सामोरे जात नाही, तो…; मुुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर ठाकरे भडकले
‘एअरबस’ प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर सामंत म्हणतात की, यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणू

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now