ठाण्यातून सध्या एक बातमी समोर आली आहे. याठिकाणी नंदकुमार ननावरेंनी काही दिवसांपूर्वी पत्नीसह आत्महत्या केली. या आत्महत्येला अंबरनाथेचे आमदार बालाणी किणीकर यांचे पीए जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
याबाबत त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. साताऱ्यातील काही लोक आम्हाला मानसिक त्रास देत असल्याने टोकाचे पाऊल उचलत असल्याचे ननावरे आत्महत्येपूर्वी म्हणाले होते. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती.
असे असताना आता आरोपींना अटक न झाल्याने नंदकुमार यांचे भाऊ धनंजय ननावरेंनी त्यांच्या हाताचे एक बोट कापून घेतले आहे. माझं बोट छाटून राज्य सरकारला पाठवलं आहे. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत शरीराचा एक-एक अवयव कापून सरकारला पाठवत राहणार, असे म्हटले आहे. याबाबत त्यांनी व्हिडिओ तयार केला आहे.
ज्या बोटाने मोदी सरकारला मतदान केले, तेच बोट मी कापले, अशा शब्दांत धनंजय त्यांनी खदखद व्यक्त केली आहे. यानंतर मात्र पोलिसांनी लगेच कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांचे स्वीय सहाय्यक शशिकांत साठे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते कमलेश निकम, राष्ट्रवादीचे पदाधिकारी नरेश गायकवाड यांच्यासह २ ते ३ जणांना अटक करण्यात आली केली.
दरम्यान, 20 दिवसांपूर्वी नंदकुमार ननावरे त्यांच्या कुटुंबासह अशेलेपाडा परिसरात राहायचे. त्यांनी पत्नी उर्मिलासोबत बंगल्याच्या छतावरुन उडी घेत आत्महत्या केली होती. यामुळे याचा तपास सुरू झाला होता.
दरम्यान, त्यानंतर एक व्हिडीओ समोर आला. त्यात ननावरेंनी कमलेश निकम, संग्राम निकाळजे, वकील ज्ञानेश्वर देशमुख, नितीन देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नंदकुमार ननावरेंनी व्हिडीओत म्हटलं होते. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. याबाबत तपास सुरू आहे.