झारखंडमधील(Jharkhand) हजारीबागमध्ये एका शेतकऱ्याच्या 27 वर्षीय गर्भवती मुलीचा ट्रॅक्टरने चिरडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा आरोप एका फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांवर आहे. याप्रकरणी पोलिसांनी फायनान्स कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापकासह चार जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.(finance-company-officials-crush-farmers-daughter-with-tractor-death-on-the-spot-case-registered-against-officials)
गुरुवारपर्यंत हप्ता न भरल्याने महिंद्रा फायनान्स(Mahindra Finance) कंपनीचे अधिकारी न कळवताच ट्रॅक्टरच्या वसुलीसाठी शेतकऱ्याच्या घरी पोहोचले, असे पीडितेच्या नातेवाईकांनी सांगितले. यादरम्यान त्यांच्यात वादावादी झाली. यानंतर मुलगी ट्रॅक्टरसमोर आली आणि त्यांनी तिला ट्रॅक्टरने चिरडले, त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तिला मृतावस्थेत रुग्णालयात नेण्यात आले.
या प्रकरणाबाबत हजारीबागचे पोलीस(Police) अधीक्षक मनोज रतन चोथे म्हणाले की, फायनान्स कंपनीचे अधिकारी माहिती न देता ट्रॅक्टर वसूल करण्यासाठी शेतकऱ्याच्या घरी पोहोचले. वादानंतर त्यांच्या मुलीला ट्रॅक्टरने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रॅक्टरच्या वसुलीसाठी शेतकऱ्याच्या घरी जाण्यापूर्वी फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात माहिती दिली नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकासह चार जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याच्या अटकेसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले असून त्याच्या शोधार्थ परिसरात छापे टाकण्यात येत आहेत.
वृत्तानुसार, पोलीस अधीक्षकांनी सांगितले की मिथिलेश मेहता(Mithilesh Mehta) हा शेतकरी अपंग आहे आणि त्याला महिंद्रा फायनान्सकडून मॅसेज आला होता की त्याने ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची 1 लाख 30 हजार रुपयांची थकबाकी गुरुवार पर्यंत जमा करावी. मात्र शेतकऱ्याने असे न केल्याने शुक्रवारी कंपनीचे एजंट व अधिकाऱ्यांनी त्याचे घर गाठून ट्रॅक्टर उचलला.
महिंद्रा समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा(Anand Mahindra) यांनी झारखंडमधील घटनेवर शोक व्यक्त केला आहे. आनंद महिंद्रा यांनी महिंद्रा फायनान्सचे सीईओ आणि एमडी अनिश शाह यांच्या ट्विटला रिट्विट करत म्हटले आहे की, “मी पीडितेच्या कुटुंबीयांशी संवेदना व्यक्त करतो. त्याचवेळी, महिंद्रा समूहाचे एमडी आणि सीईओ यांनी लिहिले की, हजारीबागच्या घटनेमुळे आम्ही खूप दुःखी आणि अस्वस्थ आहोत. ही लज्जास्पद आणि दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना कंपनीकडून सर्व सहकार्य केले जाईल.
वडील म्हणाले, दोषींना फाशी झाली पाहिजे झारखंडमधील गर्भवती महिलेच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. अपंग शेतकरी मिथिलेश मेहता यांनी आरोप केला आहे की त्यांच्या 27 वर्षीय मुलीचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली पडून मृत्यू झाला. ते म्हणाले, मला काही नको, ना नुकसानभरपाई, ना सरकारकडून कोणताही लाभ. मला फक्त माझ्या मुलीला न्याय हवा आहे आणि दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.