Share

अखेर चंद्रशेखर गुरुजींच्या हत्येमागील कारण आले समोर, चौकशीत झाला धक्कादायक खुलासा

सरल वास्तुतज्ज्ञ चंद्रशेखर अंगडी गुरुजी यांच्या हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या दोन्ही आरोपींना बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथून पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रशेखर गुरुजी यांच्या हत्येमागील खरं कारण देखील समोर आलं आहे.

चंद्रशेखर यांची कर्नाटकच्या हुबळीमध्ये एका हॉटेलमध्ये निर्घुण हत्या करण्यात आली होती. चंद्रशेखर यांच्या हत्येचा पोलीस तपास घेत होते. महांतेश आणि मंजुनाथ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. चंद्रशेखर गुरुजी यांच्या हत्येमागे ५ कोटींची मालमत्ता विकल्याचा विषय कारणीभूत असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे.

अनेक दिवसांपासून बेनामी मालमत्ता विकून पाच कोटी देण्यासाठी दबाव आणणाऱ्या महांतेश शिरूर यानं विविध वाहिन्यांवरील जाहिरातींमध्ये झळकणारे वास्तूशास्त्रज्ञ चंद्रशेखर अंगडी उर्फ चंद्रशेखर गुरुजींचा खून केल्याचं उघड झालं आहे.

माहितीनुसार, चंद्रशेखर यांचा बहुतांश व्यवसाय आरोपी महांतेश शिरुरु पाहत होता. चंद्रशेखर यांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता त्याच्या नावावर केली होती. तसंच, चंद्रशेखर यांच्यासाठी सर्वस्व अर्पण केल्यानंतर मालमत्तेचे पैसे का द्यायचे, अशी विचारणा आरोपींनी केली होती.

रागाच्या भरात मंजुनाथ आणि महांतेश यांनी चंद्रशेखर यांची हत्या केली. शिरूर यानं चंद्रशेखर यांचा विश्वास संपादन केला होता. पण, एक मालमत्ता पाच कोटींना विकल्यावरून गदारोळ झाला. यामुळं महांतेशला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आणि याच मुद्द्यावरून झालेल्या वादातून हा खून झाला.

दोन्ही आरोपींनी याबाबत खुलासा केला आहे. चंद्रशेखर गुरुजी यांच्याबद्दल अधिक माहिती म्हणजे, चंद्रशेखर अंगडी बागलकोट जिल्ह्यातले होते. त्यांनी सरल वास्तू या संस्थेची स्थापना केली होती. त्यांचं सरल जीवन नावाचं एक चॅनल होतं. कन्नड आणि मराठी टीव्ही चॅनलवर त्यांचा कार्यक्रम रोज येतो.

क्राईम

Join WhatsApp

Join Now