Share

1बॉल 4रण! लास्ट बॉलवेळी धोनीच्या डोळ्यात अश्रू पाहताच जडेजाने गुजरातला चिरडून CSKला चॅम्पियन बनवले

CSK vs GT: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) चा अंतिम सामना पावसामुळे 28 मे ऐवजी 29 मे रोजी खेळवण्यात आला. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (CSK vs GT) यांच्यात झालेल्या या सामन्यात CSK संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

फायनलसारख्या मोठ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्स संघाने शानदार फलंदाजी करताना 214 धावांपर्यंत मजल मारली.

अंतिम सामन्यात 215 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना CSK संघाच्या डावात पाऊस पडला, त्यामुळे CSK संघाला 15 षटकात 171 धावांचे लक्ष्य मिळाले.

याला प्रत्युत्तर म्हणून CSK संघाने शानदार फलंदाजी करताना सामन्यातील शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला आणि पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर कब्जा केला.

पावसानंतर सामना पुन्हा सुरू झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या डावाची सुरुवात करण्यासाठी डेव्हिड कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड आले. तर पंड्याने पहिल्याच षटकात शमीकडे चेंडू सोपवला. ज्यात गायकवाडने 10 धावा केल्या.

पॉवर प्लेमध्ये दोन्ही खेळाडूंनी वेगवान फलंदाजी करत आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोन्ही खेळाडूंमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. ऋतुराज गायकवाडने 16 चेंडूत 26 धावा केल्या.

तर कॉणवे 47 धावा करून बाद झाला. त्यानंतर अजिंक्य रहाणेने 13 चेंडूत 27 धावा करून चेन्नईच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या.रहाणे बाद झाल्यानंतर चेन्नईला 22 चेंडूत 51 धावांची गरज होती.

शिवम दुबे आणि अंबाती रायडू क्रीजवर उपस्थित होते. शेवटी अंबाती 19 आणि धोनी खाते न उघडता बाद झाले. तो बाद झाल्यानंतर मैदानात शांतता पसरली. शिवम दुबे क्रीजवर राहिला. चेन्नईला 6 चेंडूत 13 धावांची गरज होती.

पहील्या ४ चेंडूत फक्त ३ धावा निघाल्या होत्या. पण स्ट्राईकला रविंद्र जडेजा होता. शेवटच्या दोन चेंडूवर एक षटकार आणि एक चौकार खेचत रविंद्र जडेजाने चेन्नई सुपर किंग्जला विजयी केले.

IPL 2023 च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने दमदार फलंदाजी करत निर्धारित 20 षटकात 214 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध, गुजरात टायटन्सचे सलामीवीर रिद्धिमान साहा आणि साई सुदर्शन यांनी धडाकेबाज खेळी खेळली.

साहाने 39 चेंडूत 54 धावा केल्या, तर सुदर्शनने 47 चेंडूत 96 धावा फटकावल्या. त्याच्या खेळीत 8 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. या दोन खेळाडूंच्या खेळीने गुजरात संघ मजबूत स्थितीत पोहोचला.

याशिवाय शुभमन गिलने 20 चेंडूत 39 आणि हार्दिक पांड्याने 12 चेंडूत 21 धावा केल्या. तर राशिद खान खाते न उघडता बाद झाला. साई सुर्दशनचे शतक अवघ्या ४ धावांनी हुकले.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now