Share

politics : शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मुंबई विद्यापीठात घाणीचे साम्राज्य; सर्वत्र दारूच्या बाटल्यांचा ढिग

botal alkohol

politics : काल शिवसेनेचे मुंबईमध्ये दोन दसरा मेळावे पार पडले. परंपरेनुसार शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा घेतला. तर दुसरीकडे शिवसेनेत बंडखोरी केलेल्या शिंदे गटाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बीकेसीवर दसरा मेळावा घेतला. जास्तीत जास्त गर्दी दसरा मेळाव्याला व्हावी, यासाठी मोठी रस्सीखेच दोन गटांमध्ये सुरू होती. मात्र बीकेसीच्या दसरा मेळाव्यात आलेल्या शिवसैनिकांबाबत एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बीकेसीवरील मेळाव्यामध्ये त्यांचे भाषण ऐकण्यासाठी, त्यांच्या समर्थनार्थ असंख्य कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते. त्या कार्यकर्त्यांच्या गाड्या लावण्यासाठी शिंदे गटाकडून मुंबई विद्यापीठातील मोकळ्या मैदानावर व्यवस्था करण्यात आली होती. मात्र त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या, कचऱ्याचा खच पडल्याचा आरोप युवासेनेने केला आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून, दूरच्या भागातून आलेले कार्यकर्ते दसरा मेळाव्याच्या आदल्या दिवशीच मुंबई दाखल झाले होते. त्यांच्या गाड्यांची व्यवस्था शिंदे गटाने मुंबई विद्यापीठाच्या कलीना परिसरातील ग्राउंडवर केली होती. त्या ठिकाणी मद्यपान करून कार्यकर्त्यांनी बाटल्या फेकल्या. मोठा कचऱ्याचा ढीग पण तिथे आहे. यामुळे आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी युवासेनेकडून होत आहे.

बीकेसीच्या दसरा मेळाव्याला अधिकाधिक गर्दी जमावी. या हेतूने राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची जमवाजमव शिंदे गटाकडून करण्यात आली, असे बोलले जाते. मात्र हे कार्यकर्ते विचार ऐकण्यासाठी आले होते की, दुसऱ्याच गोष्टींसाठी? असा सवाल पण विचारला जातोय.

बीकेसीवरील दसरा मेळाव्यात राज्यभरातून कार्यकर्त्यांना बोलावून गर्दी जमवण्यात शिंदे गट यशस्वी झाला. मात्र त्यांनी केलेल्या या गैरकृत्याबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणती भूमिका घेतायेत? याबाबत राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगत आहेत. मद्यपान करून टाकलेल्या बाटल्यांचा खच, भरपूर कचरा कार्यकर्त्यांच्या गाड्या लावण्याची व्यवस्था असलेल्या मैदानावर आढळून आला. त्यावरून उद्धव ठाकरे समर्थकांकडून शिंदेंना धारेवर धरले जात आहे.

मुंबई विद्यापीठातील मैदानाबाबत शिंदे गटाचा कार्यकर्त्यांनी केलेल्या या गैरप्रकाराबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना विचारण्यात आले. त्यावर त्या म्हणाल्या, ‘उपमुख्यमंत्री संवेदनशील आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठात जो हा प्रकार घडला. त्याबाबत कारवाई केली पाहिजे.’

महत्वाच्या बातम्या-
Ekanth Shinde : ‘मुख्यमंत्री शिंदेंचे भाषण फारच सुमार, वत्कृत्व आणि लोकांचे प्रेम विकत आणता येत नाही’
organic farming: सरकारी नोकरी सोडून सुरू केली सेंद्रिय शेती, आता सफरचंद-किवीपासून कमावतोय तब्बल ४० लाख
Eknath Shinde : ….तर त्याला नक्कीच हार्टअटॅक आला असता; शिंदेंनी सांगितला ठाकरेंसोबतचा “तो” किस्सा

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now