काही वर्षांपासून संपूर्ण जगावर कोरोना महामारीचे सावट आहे. मात्र सध्या या महामारीचा प्रभाव कमी होत आहे. त्यामुळे दैनंदिन जीवन हे सुरळीत सुरू होत आहे. तसेच मनोरंजन क्षेत्रात अनेक चांगले बदल होत आहेत. अनेक मोठमोठे प्रोजेक्ट सध्या समोर येत आहेत. अनेक नवीन कथा घेऊन चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. इतकेच नव्हे तर या चित्रपटाचे बजेट देखील जास्त आहे.
साल २०२२ मध्ये अनेक मोठे बजेट असलेले चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्याचबरोबर या चित्रपटाची स्टार कॅस्ट देखील चांगली आहे. या भल्यामोठ्या चित्रपटाचे बजेट ऐकून तुमच्या देखील भुवया उंचावतील. या चित्रपटाचे बजेट ३०० करोड पेक्षा ही जास्त आहे. होय असे चित्रपट येत्या काही दिवसात येणार आहेत ज्यांचे बजेट ३०० करोडपेक्षा जास्त आहे. अशाच चित्रपटाबद्दल आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
१. पोंनियीन सेलवान
या यादीत ‘पोंनियीन सेलवान’ हा चित्रपट पहिल्या स्थानावर आहे. या चित्रपटाची निर्मिती निर्माता मनी रत्नम यांनी केली आहे. हा एक तमिळ चित्रपट आहे. हा चित्रपट या वर्षीचा सर्वात महागडा चित्रपट आहे. या चित्रपटाचे बजेट जवळजवळ ५०० करोडचे आहे. तसेच या चित्रपटात अभिनेता विक्रम, अभिनेत्री ऐश्वर्या राय, प्रकाश राज, प्रभू गणेसन हे दिग्गज कलाकार आहेत. तर या चित्रपटाचे संगीत ए आर रेहमानने दिलेले आहे.
२. आदीपुरूष
हा चित्रपट बजेटच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. ‘आदीपुरूष’ हा चित्रपट रामायणवर आधारित आहे. या चित्रपटाचे बजेट जवळजवळ ५०० करोड इतके आहे. टी सीरिज आणि रेट्रो फाईल प्रोडक्शन निर्मित हा एक ३डी चित्रपट आहे. या चित्रपटात प्रभास, सैफ अली खान, क्रिती सनेन हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२२ ला प्रदर्शित होणार होता. मात्र ‘लालसिंग चढ्ढा’ चित्रपटामुळे या चित्रपटाची प्रदर्शित तारीख पुढे ढकलली आहे.
३. आरआरआर
हा चित्रपट बजेटच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘आरआरआर’ या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि राम चरण हे मुख्य भूमिकेत आहेत. तर आलिया भट्ट आणि अजय देवगण देखील आहेत. मात्र तर या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट एस एस राजा मोली यांची निर्मिती आहे. तर या चित्रपटाचे बजेट ४०० करोड इतके आहे. हा चित्रपट २५ मार्च २०२२ रोजी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
४. राधेश्याम
या चित्रपटाचे देखील बाकीच्या प्रमाणे जास्त आहे. या चित्रपटात प्रभास आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच या चित्रपटाचे बजेट ३५० करोड इतके आहे. तर याचे दिग्दर्शन राधाकृष्ण कुमारने केले आहे. हा चित्रपट १९७० युरोप मधील एक प्रेम कथा आहे. ‘राधेश्याम’ हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम मध्ये प्रदर्शित होणार आहे. तर ११ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.
५. पृथ्वीराज
या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्स करणार असून हा चित्रपट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे. तसेच या चित्रपटाचे बजेट ३०० करोड रुपये आहे. तर मुख्य भूमिकेत अक्षय कुमार आणि मानुषी चिल्लर हे आहेत. मानुषी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याचबरोबर संजय दत्त आणि सोनू सूद देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत. तर हा चित्रपट १० जून २०२२ ला प्रदर्शित होणार आहे.
६. ब्रम्हास्त्र
या चित्रपटाची निर्मिती अयान मुखर्जीने केली आहे. बजेटच्या तुलनेत हा देखील चित्रपट ३०० करोडचा आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, रणबीर कपूर, महानायक अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय मुख्य भूमिकेत आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरने केले आहे. हा चित्रपट ११ सप्टेंबर २०२२ ला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. तर या चित्रपटाला संगीत प्रीतमने दिले आहे.
https://www.instagram.com/p/CXgUSXNv_4F/?utm_medium=copy_link