Share

पॅन इंडिया इमेज बनवायच्या नादात ‘या’ साऊथ स्टार्सचे चित्रपट झाले फ्लॉप, इज्जत वाचवणंही झालं कठीण

आजकाल साऊथच्या चित्रपटांच क्रेझ बघायला मिळत आहे. दाक्षिणात्य चित्रपटांनी थिएटरमध्ये धुमाकूळ घातला आहे. यामुळेच निर्माते आता हिंदी बॉक्स ऑफिसवरही जोरदारपणे साऊथचे चित्रपट रिलीज करत आहेत. तथापि, या यादीत असे काही साऊथ सुपरस्टार आहेत ज्यांच्या चित्रपटाने त्यांच्या राज्यात चांगले काम केले, पण ते चित्रपट हिंदी बॉक्स ऑफिसवर तोंडघशी पडले आहेत. या यादीत बीस्ट स्टार थलपथी विजयसोबतच वलीमाई स्टार अजित कुमार सारख्या बड्या स्टार्सच्या नावांचा समावेश आहे. या साऊथ सुपरस्टार्सच्या नावांची यादी पाहूया.(Films of these South Stars flop in the name of creating a pan India image)

थलापति विजय

थलपथी विजय
तमिळ सुपरस्टार थलपथी विजय हा रजनीकांतनंतर कॉलिवूडमधील दुसरा सर्वात मोठा स्टार मानला जातो. तमिळ चित्रपटसृष्टीत त्यांचे चित्रपट सर्रास चालतात. हे लक्षात घेऊन निर्मात्यांनी त्याचा बीस्ट हा चित्रपट हिंदीतही मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित केला. पण हा चित्रपट हिंदी बॉक्स ऑफिसवर सपाटून पडला आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतही अशीच परिस्थिती या चित्रपटाची होती. या चित्रपटामुळे थलपथी विजय चांगलाच ट्रोल झाला होता.

अजित कुमार

अजित कुमार
नुकताच प्रदर्शित झालेला अजित कुमारचा वलिमाई हा चित्रपटही निर्मात्यांनी तमिळ, तेलुगु तसेच हिंदीमध्ये प्रदर्शित केला. या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती. उत्तर भारतातही या चित्रपटाची चर्चा होती. असे असूनही अजित कुमार प्रेक्षकांच्या हृदयात स्वत:चे स्थान निर्माण करू शकला नाही आणि हिंदी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची कामगिरी फ्लॉप ठरली

सूर्या शिवकुमार

सूर्या शिवकुमार
तमिळ चित्रपट स्टार सूर्या शिवकुमारच्या ईटी चित्रपटाचीही बरीच चर्चा झाली होती. पॅन इंडिया स्तरावरही हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित झाला. हा चित्रपट हिंदी बॉक्स ऑफिसवर वाईटरित्या फ्लॉप झाला. तसेच हा एक्टर जय भीम आणि सोरारई पोट्टरू या अभिनेत्यांमुळे मिळालेल्या लोकप्रियतेचा फायदा घेऊ शकला नाही.

रवि तेजा

रवी तेजा
मुळे रवी तेजा यांना तेलुगू सिनेसृष्टीत मास महाराजा म्हणून संबोधले जाते. कारण त्याचे सिनेमे मोठ्या प्रमाणावर मनोरंजन करणारे असतात. ज्यामुळे क्रैक स्टारचे  चित्रपट थिएटरमध्ये खूप धुमाकूळ घालतात. मात्र, फिल्मस्टार रवी तेजाचा पहिला पॅन इंडिया चित्रपट ‘खिलाडी’ची परिस्थिती खूपच वाईट होती. हिंदी बॉक्स ऑफिसवर येताच हा चित्रपट तोंडघशी पडला.

किच्चा सुदीपा

किच्चा सुदीपा
कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीपाने सलमान खान स्टारर दबंग 3 मधून हिंदी बॉक्स ऑफिसवर पदार्पण केले. या चित्रपटानेही फारशी कमाई केली नाही आणि किच्चा सुदीपाचे पॅन इंडिया स्टार बनण्याचे स्वप्न अद्याप पूर्ण होऊ शकले नाही. आता लवकरच अभिनेता विक्रांत रोना नावाच्या पॅन इंडिया चित्रपटासह पुन्हा थिएटरमध्ये येण्याच्या तयारीत आहे.

दुलकर सलमान

दुलकर सलमान
मल्याळम चित्रपट स्टार दुलकर सलमान हा सुपरस्टार ममूटीचा मुलगा आहे. ज्याने इरफान खान स्टारर ‘कारवां’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. यानंतर तो सोनम कपूर स्टारर ‘द जोया फॅक्टर’ या हिंदी चित्रपटातही दिसला. हे दोन्ही चित्रपट हिंदी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकले नाहीत आणि मल्याळम चित्रपटांचा मोठा स्टार मानल्या जाणाऱ्या या अभिनेत्याचे पॅन इंडियाचा मोठा स्टार बनण्याचे स्वप्नही केवळ स्वप्नच राहिले.

महत्वाच्या बातम्या-
साऊथनंतर आता बॉलिवूड चित्रपटात धमाल करणार का? महेश बाबूने दिले सणसणीत उत्तर
मुंबईतल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या या व्यक्तीने दिलाय KGF मध्ये यशला आवाज, वाचा इथपर्यंतचा प्रवास
एमएस धोनीच्या एक्स गर्लफ्रेंडचे हॉट फोटो व्हायरल; अदा पाहून चाहते घायाळ
लहाणपणी उपाशी झोपायचा, बहिणीच्या मृत्युनंतर झाला होता शांत, विजयची कहाणी वाचून व्हाल भावूक

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now