भारतीय क्रिकेट संघातील कॅप्टन कूल या नावाने प्रसिद्ध असलेल्या आणि आयपीएल (IPL) वगळता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या महेंद्रसिंग धोनीवर (Mahendra Singh Dhoni) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्रसिंग धोनीविरुद्ध बिहारच्या बेगुसराय न्यायालयात ( Begusarai Court) तक्रार दाखल करण्यात आली असून, त्यात त्याला आरोपी बनवण्यात आले आहे.(MS Dhoni, Begusarai Court, IPL, Crime)
या प्रकरणात धोनीशिवाय इतर ७ जणांनाही आरोपी करण्यात आले आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ज्या प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो ३० लाख रुपयांचा चेक बाऊन्सचा गुन्हा आहे. सीजेएम यांच्या न्यायालयात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका खत विक्रेत्याने धोनीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, दोन कंपन्यांमध्ये वाद सुरू आहे. दाखल केलेल्या तक्रारीनुसार, एका खत कंपनीने आपल्या उत्पादनाच्या विक्रीसाठी एसके एंटरप्रायजेस बेगुसराय नावाच्या एजन्सीसोबत करार केला होता. कंपनीच्या वतीने एजन्सीकडे खत पाठवण्यात आले मात्र तेथून मार्केटिंगचे सहकार्य मिळाले नाही. यानंतर एजन्सीचे मालक नीरजकुमार निराला यांनी कंपनीवर असहकाराचा आरोप केला आणि त्यामुळे आपले नुकसान झाल्याचे सांगितले.
याप्रकरणी तक्रार केल्यानंतर कंपनीने अडकलेले खत परत घेऊन त्याबदल्यात ३० लाखांचा चेक दिला. त्यानंतर हा चेक बँकेत टाकला असता तो बाऊन्स झाला. याबाबत कंपनीला वारंवार माहिती देऊनही त्याची दखल घेण्यात आली नाही. यानंतर चेक बाऊन्स झाल्याबद्दल कंपनीला कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आली, मात्र त्याचेही उत्तर न मिळाल्याने नाराज होऊन नीरज कुमार निरा न्यायालयाच्या आश्रयाला गेले.
या कंपनीच्या उत्पादनाची जाहिरात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने केली होती. त्यामुळे नीरज कुमार निराला यांनी धोनीविरोधात गुन्हाही दाखल केला आहे. यासोबतच कंपनीच्या सीईओसह सात जणांनाही आरोपी करण्यात आले आहे. न्यायालयाने हे प्रकरण ग्राह्य धरून पुढील सुनावणी २८ जून रोजी निश्चित केली आहे. या प्रकरणात महेंद्रसिंग धोनीचे नाव आल्याने हे प्रकरण चर्चेत आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
रोहित शर्मा की महेंद्रसिंग धोनी? कमाईच्या बाबतीत खरा कॅप्टन कोण? आकडे वाचून डोळे फिरतील
महेंद्रसिंग धोनी नंबर ७ ची जर्सी का घालतो? स्वत:च सांगितली जर्सीमागची इनसाईड स्टोरी
धोनीचा खास हा खेळाडू असेल चेन्नईचा भावी कर्णधार, वीरेंद्र सेहवागने केला नावाचा खुलासा
मी फक्त धोनीसोबतच नाही तर ‘या’ लोकांसोबतही रिलेशनशिपमध्ये होते; धोनीच्या एक्स गर्लफ्रेंडचा खुलासा