Share

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीवर पंतप्रधान मोदींच्या खुनाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करा; भाजपच्या मागणीने खळबळ

bjp flag

राज्यात लाऊडस्पीकरच्या मुद्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणाचा इशारा दिला होता. त्यानंतर नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक झाल्यानंतर त्यांना खार पोलीस ठाण्यात आणण्यात आलं.

अटक झाल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी सोमय्या पोहोचले. त्यावेळी पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सोमय्या पोलीस ठाण्यातून निघत असताना शिवसैनिकांनी त्यांच्या कारवर हल्ला केला. त्यांच्या कारची काच फुटली आणि सोमय्यांना जखम झाली.

सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर हा वाद आणखीच चिघळला. तर दुसरीकडे शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याचे समर्थन केलं आहे. सोमय्या काय त्या कारमध्ये जर मोदी जरी असते तरी शिवसैनिकांनी कार फोडली असती असं खळबळजनक विधान दिपाली सय्यद यांनी केलं.

यावर आता भाजपची प्रतिक्रिया आली आहे. सय्यद यांनी भारताच्या पंतप्रधानांबद्दल जे वक्तव्य केलं, त्याबद्दल सय्यद यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपच्या महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा पाटील यांनी केली आहे. याबाबत सातारा शहर पोलीस निरीक्षक यांच्याकडं लेखी निवेदना देखील दिले आहे.

‘सय्यद यांच्यावर राजद्रोह आणि हत्येचा कट रचल्याचा गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. त्यामुळे आता दिपाली सय्यद यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याची शक्यता वाढली आहे. तसेच आता सय्यद यांच्या विरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

पुढे सुवर्णा पाटील म्हणतात, ‘सय्यद यांची क्लिप प्रसारित झाली असून ‘सोमय्या यांच्या जागी मोदी जरी असते तरी त्यांच्यावर हल्ला झाला असता. यावरून हे लक्षात येते की हा हल्ला पूर्वनियोजित आहे. काहीही झालं तरी हल्ला करायचाच, या उद्देशाने त्या ठिकाणी जमाव गोळा केला गेला होता,’ असा आरोप त्यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या
अंगठे बहादूर महिलेनी केली कमाल! शिमला मिरची लागवड करून कमविले लाखो रुपये; तुम्हीही करू शकता प्रयोग
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! मुलाला वाचविण्यासाठी वडिलांनी पाण्यात उडी घेतली पण…
नवनीत राणांच्या डी गँग कनेक्शनवर फडणवीस गप्प का?, संजय राऊत यांचा संतप्त सवाल
समान नागरी कायदा असंवैधानिक, पर्सनल लॉ बोर्ड म्हणाले, ‘मुस्लिम कधीच त्याला स्वीकारणार नाहीत’

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now