एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या ‘RRR’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. राम चरण, ज्युनियर एनटीआर, आलिया भट्ट आणि अजय देवगण स्टारर या चित्रपटाने जगभरात सुमारे 1000 कोटींचा टप्पा गाठला आहे. या चित्रपटासाठी चित्रपट कलाकारांनी भरमसाठ रक्कम घेतल्याचे वृत्त आहे. जाणून घेऊया कोणत्या स्टारला किती फी मिळाली आणि कोण या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.(Fees of Ramcharan and Jr NTR for RRR)
अभिनेता ज्युनियर एनटीआर RRR चित्रपटात क्रांतिकारक कोमाराव भीमच्या भूमिकेत दिसत आहे, ज्याने हैदराबादच्या निजामाविरुद्ध बंड केले. कोमाराम आणि स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू यांनी हैदराबादच्या निजाम आणि ब्रिटिश राजवटीविरुद्ध बंडाची ठिणगी पेटवली. या चित्रपटासाठी ज्युनियर एनटीआरने 45 कोटी रुपये आकारले असल्याचे अहवालात म्हटले आहे.
RRR चित्रपटात राम चरण यांनी स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू यांची भूमिका साकारली होती. अल्लुरी सीताराम राजू यांनी रामपा विद्रोहाची चळवळ सुरू केली आणि भारतातील ब्रिटिश राजवटीविरुद्ध मोहीम चालवली. या चित्रपटासाठी राम चरणने निर्मात्यांकडून 45 कोटी रुपये फी देखील घेतल्याचे वृत्त आहे.
अजय देवगण RRR चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसला आहे. या चित्रपटासाठी त्याने केवळ 7 दिवस शूट केल्याचे सांगितले जाते आणि यासाठी त्याला निर्मात्यांकडून 35 कोटी रुपये मिळाल्याची चर्चा आहे. अजय देवगणचे चाहते साउथमध्येही पाहायला मिळतात.
या चित्रपटात आलिया भट्टची केवळ 20 मिनिटांची भूमिका आहे. या चित्रपटात तिने अल्लुरी सीताराम राजूची मंगेतर सीतेची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी तिला 9 कोटी रुपये फी म्हणून देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
हा चित्रपट बनवण्यामागे ज्यांचा सर्वात मोठा हात आहे आणि ज्यांनी याचे दिग्दर्शन केले आहे, म्हणजेच S.S. राजामौली यांना चित्रपटातून 30% नफा मिळणार आहे. आपल्या सर्वांनाच माहित आहे की राजामौली यांचे सगळेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतात.
श्रिया सरन या चित्रपटात अल्लुरी सीताराम राजूच्या आई सरोजिनीच्या भूमिकेत दिसली, ज्यासाठी तिला 1 कोटी रुपये फी मिळाल्याचे सांगितले जाते. या चित्रपटातील श्रिया सरन भूमिकाही प्रेक्षकांना पसंद पडली आहे.
आरआरआर चित्रपटात ज्युनियर एनटीआर सोबत ब्रिटीश अभिनेत्री ऑलिव्हिया मॉरिस दिसली आहे. या भूमिकेसाठी तिला एक कोटी रुपये मानधन मिळाल्याचे वृत्त आहे. चित्रपटातील सर्वच कलाकारांचे कौतुक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
३८ पैशांच्या शेअरने एका वर्षात दिला १५ हजार टक्क्यांपेक्षा जास्त परतावा, १ लाखाचे झाले १.५८ कोटी
महागाई, शिक्षण सोडून धर्मावर भर दिला जातोय; राज ठाकरेंच्या भाषणानंतर मनसेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्याचा राजीनामा
मावशीने मुलीला गुंगीचं औषध देऊन केलं बेशुद्ध; मग विवस्त्र फोटो काढत केलं ‘हे’ घृणास्पद काम
फुटपाथवर पडून होता मालकाचा मृतदेह, तासनतास पहारा देत होता कुत्रा, रशिया-युक्रेन वारमधील ह्रदयद्रावक फोटो