Share

Tennis players: असा खेळाडू होणे नाही! शेवटच्या मॅचमध्ये लहान मुलासारखा रडला फेडरर, नडालचेही डोळे आले भरून

Roger Federer, tennis players, Francis Tiafoe, Jack Sock/ जगातील महान टेनिसपटूंपैकी (tennis players) एक असलेला रॉजर फेडररने शुक्रवारी आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला. या लेव्हर चषक सामन्यात त्याने राफेल नदालसोबत जोडी केली. मात्र, दोन्ही दिग्गजांना हा सामना जिंकता आला नाही. अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफो आणि जॅक सॉक या जोडीचा ४-६, ७-६(२), ११-९ असा पराभव केला. यासह फेडररने ओल्या डोळ्यांनी टेनिसला अलविदा केला. यादरम्यान नोव्हाक जोकोविच आणि राफेल नदाल यांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत.

त्याच्या शेवटच्या सामन्यानंतर नोव्हाक जोकोविचसह अनेक खेळाडूंनी रॉजर फेडररला खांद्यावर उचलून घेतले. फेडरर अनेक महान टेनिसपटूंसाठी प्रेरणास्थान आहे. सामना संपल्यानंतर रॉजर फेडररने प्रेक्षकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. मात्र, गेल्या सामन्यातील पराभवाचे दुख: त्याच्या डोळ्यांत दिसत होते. या सामन्यात फेडररचे प्रतिस्पर्धीही खूप भावूक झाले होते आणि त्याच्या निवृत्तीने दु:खी झाले होते.

फेडररच्या शेवटच्या सामन्यादरम्यान त्याची पत्नी मिर्काही खूप भावूक दिसली. मिर्काने फेडररला मिठी मारली आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या सामन्यात फेडरर खूप भावूक झाला होता. तो आपले अश्रू आवरू शकत नव्हता. रॉजर फेडरर हे गेल्या दोन दशकात टेनिस क्षेत्रातील सर्वाधिक चर्चेत असलेले नाव होते. त्याची टेनिस कारकीर्द २४ वर्षांची होती.

सचिन तेंडुलकरची क्रिकेटमधील कारकीर्दही तशी मोठी होती. आज फेडररची जी क्रेझ पाहायला मिळत आहे, तीच क्रेझ २०१३ मध्ये सचिनसाठी होती. रॉजर फेडररने आपल्या कारकिर्दीत २० ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. मात्र, गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला २०२१ च्या विम्बल्डननंतर एकही सामना खेळला नाही. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि आता त्याने पुनरागमन केले, पण पुनरागमनानंतर तो जास्त सामने खेळला नाही.

फेडररने आपल्या पत्नीबद्दल सांगितले की, ती त्याला खूप आधी थांबवू शकली असती, परंतु तिने तसे केले नाही आणि फेडररला त्याच्या कारकिर्दीत पुढे जाऊ दिले. तिच्या पाठिंब्यामुळेच तो हे सर्व साध्य करू शकला. या सामन्यादरम्यान फेडरर आणि नदालही मस्ती करताना दिसले. दोन्ही खेळाडू बराच वेळ एकमेकांविरुद्ध खेळले आणि दोघांनीही एकमेकांना कडवे आव्हान दिले, पण फेडररच्या शेवटच्या सामन्यात नदाल खूपच उदास आणि भावूक दिसत होता.

विशेष म्हणजे या सामन्यात दोघेही एकत्र खेळले होते. रॉजर फेडररने सामना संपल्यानंतर टेनिस कोर्टवरून परततानाचा फोटो शेअर केला आहे. यासोबतच त्याने लिहिले की, यापूर्वी हजारोवेळा हे काम केले आहे, मात्र यावेळी वेगळीच भावना आहे.

या सामन्यादरम्यान रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच एकत्र दिसले. टेनिस कोर्टवर हे तिन्ही दिग्गज खेळाडू म्हणून दिसण्याची ही शेवटची वेळ होती. प्रदीर्घ काळ टेनिस विश्वावर राज्य करणाऱ्या या तीन खेळाडूंचा काळ आता जवळपास संपला आहे. आगामी काळात नदाल आणि जोकोविचही निवृत्त होऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या-
amit shah : अमित शाह यांच्या बैठकीत नाराजीनाट्य..! भाजपच्या फायरब्रँड नेत्यालाच दाखवला बाहेरचा रस्ता; वाचा सविस्तर
ram shinde : ठाकरेंच्या ‘या’ चुकीमुळे सरकार कोसळलं; सत्तांतरानंतर दोन महिन्यांनी भाजप नेत्याने फोडलं गुपित
ram shinde : ठाकरेंच्या ‘या’ चुकीमुळे सरकार कोसळलं; सत्तांतरानंतर दोन महिन्यांनी भाजप नेत्याने फोडलं गुपित

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now