मशिदीवरील भोंग्याच्या वादावरून राजकारण चांगलेच तापलेले आहे. आता या वादात सर्वसामान्य जनता देखील सहभागी झाल्याची दिसून येत आहे. शनिवारी संध्याकाळी सातारा परिसरातील एका मशिदीत नमाजाचे पठण होत असतानाच त्याठिकाणी भोंगे लावण्यात आल्याची घटना घडली आहे.
या भोंग्यावर हनुमान चालीसासह इतर धार्मिक गाणी वाजविण्यात आली होती. त्यानंतर सामाजिक शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे सुरक्षा बलातील फाैजदार किशोर मलकूनाईक यांनीच सर्व प्रकार घडवून आणला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सिल्क मिल्क कॉलनीत मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी बसले होते. परंतु त्यांनी नमाज पठणाला सुरुवात करताच किशोर मलकूनाईक यांनी इमारतीमधून मशिदीच्या दिशेने लाऊडस्पीकर लावून त्यावर हनुमान चालीसासह इतर धार्मिक गाणी वाजविण्यास सुरूवात केली.
ही बाब पोलिसांना समजताच त्यांनी किशोर मलकूनाईक यांच्यावर कारवाई केली आहे. जबाबदार पदावर असताना देखील दोन धर्मात शत्रुत्व वाढेल आणि एकोप्यास बाधा होईल अशी कामगिरी केल्यामुळे पोलिसांनी मलकूनाईक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान सध्या राज्यात भोंग्याच्या वादावरून खळबळ माजलेली दिसत आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार केल्यामुळे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर विरोधी पक्षानेत्यांमध्ये जोरदार टीकाटीपणी होत आहे.
महत्वाच्या बातम्या
जगप्रसिद्ध उद्योगपती एलोन मस्क बनले Twitter चे नवे मालक, कंपनीमध्ये करणार ‘हे’ नवीन बदल
यापुढे किरीट सोमय्यांवर हल्ला केल्यास कमांडो थेट गोळ्या घालणार; पहा कुणी दिलेत ‘हे’ आदेश
सभेपुर्वीच मनसेला धक्का! औरंगाबादमधील फायरब्रॅंड नेत्याचा मनसे सोडून भाजपात प्रवेश
मंगेशकर कुटुंबाची उंची किती? आपली उंची किती? बोलतो किती?, भाजपचा आव्हाडांवर हल्लाबोल