Share

एक चान्स दे, नाहीतर तु ज्या मुलासोबत बोलते त्याचे पुरावे मी…; वडिलांच्या मित्राची भयानक मागणी 

girl

fathers frriend offer to daughter | गेल्या काही महिन्यांपासून राज्यात महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहे. काही घटनांमध्ये तर जवळच्याच लोकांनी हा अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पण आता औरंगाबादमधून एक विचित्रच घटना समोर आली आहे.

एक चान्स दे म्हणत वडिलांच्या मित्राने थेट मुलीलाच मागणी घातली असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपुर्ण औरंगाबादमध्ये खळबळ उडाली आहे. आरोपी हा मित्राच्या मुलीवरच डोळा ठेवून होता. पण आता पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मुलीचे वडील हे ड्रायव्हर आहे. त्यांनी आपल्या मित्राला मुलीवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. पण त्यानंतर त्या मित्रानेच मुलीला मागणी घातली. ज्या मुलासोबत तु बोलते त्याचे पुरावे माझ्याकडे आहे. वडिलांना सांगू नये असे तुला वाटत असेल तर मला भेटायला ये आणि एक चान्स दे, अशी मागणी केली होती.

वडिलांच्या मित्रानेच अशी मागणी केल्यामुळे मुलगी खुप घाबरली होती. त्यामुळे तिने तीन दिवसांपासून जेवण केले नव्हते. त्यानंतर घाबरलेल्या मुलीने शेवटी दामिनी पथकाला याबाबत सांगितले. त्यानंतर दामिनी पथकाने त्या व्यक्तीवर कारवाई केली आहे.

दामिनी पथकाला मुलीने याबाबत माहिती दिली. त्यानंतर दामिनी पथकाने एक सापळा रचला. त्यानंतर दामिनी पथकाने त्या नगराधामास ताब्यात घेतले आहे. पोलिस याप्रकरणी आणखी तपास करत आहे. पण या प्रकारामुळे संपुर्ण औरंगाबादमध्ये खळबळ उडाली आहे.

दरम्यान, औरंगाबामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असते. भररस्त्यात जीव घेण्याच्या घटनाही समोर येत आहे. त्यामुळे पोलिस सध्या यावर लक्ष ठेऊन असून असे काही घडू नये यासाठी पोलिस सतर्क आहे. तसेच अशी काही घटना घडली तर पोलिसही तातडीने कारवाई करत आहे.

महत्वाच्या बातम्या-
gautami patil : गौतमीसाठी म्हातारेही झाले पागल, खुर्च्या बॅरिकेट्स तोडून लोकं स्टेजवर; सोलापूरात तुफान राडा
shinde group : शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा भर रस्त्यात भाजप नेत्यावर खुनी हल्ला; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल
अपघातानंतर तडफडणाऱ्या पंतला मदत करण्याऐवजी स्थानिक लोकांनी केलं ‘हे’ लज्जास्पद कृत्य

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now