Share

बाप की राक्षस! पोटच्या मुलीवर अनेकदा केला बलात्कार, असा झाला खुलासा

raped

देशात गेल्या काही महिन्यांपासून महिला अत्याचाराच्या मोठ्या प्रमाणात धक्कादायक घटना समोर येत आहे. अनेक ठिकाणी तर नातेवाईकच बलात्कार करत असल्याच्या घटना समोर आल्या आहे. असे असताना आता वडिलांच्या नावाला काळिमा फासणारी घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.

एका बापाने आपल्या दोन मुलींवर बलात्कार केला आहे. ही घटना शहरातील बरायठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. मध्य प्रदेशातील सागरमध्ये ही घटना घडल्याची समोर आले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे बाप – लेकीच्या नात्याला कलंक लागला आहे.

वडिलांच्या या दुष्कृत्याने त्रासलेल्या मुलींनी आजीला ही गोष्ट सांगितली. यानंतर अल्पवयीन मुलींनी आजीसह पोलीस ठाणे गाठून वडिलांच्या क्रौर्याविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

वडील 3-4 महिन्यांपासून मुलींवर बलात्कार करत असल्याची माहिती मुलींनी पोलिसांना दिली. पप्पांनी 3-4 दिवसांपूर्वी माझ्यासोबत चुकीचे काम केले होते. पप्पांच्या भीतीमुळे आम्ही तुम्हाला सांगू शकलो नसल्याचे मुलींनी पोलिसांना सांगितले. मुलींनी दिलेल्या माहितीनुसार, बरायठा पोलिस ठाणे गाठून आरोपी वडिलांविरुद्ध तक्रार दाखल केली.

तसेच मुलीच्या आजीने पोलिसांना सांगितले की, माझी मोठी नात जास्त बोलू शकत नसून हातवारे करून बोलते. तिच्या हावभावावरून मला सगळं कळतं. आज सकाळी माझ्या नातवाने हातवारे करत सांगितले की, काल रात्री पापाने माझ्यासोबत जबरदस्तीने चुकीचे कृत्य केले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुलगी फोनवर जास्त वेळ घालवत असल्याने पित्याने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. संबंधित घटना ही आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टनममध्ये घडली होती. या अत्याचाराचा सामना करु न शकलेल्या पीडितीने याबाबत शिक्षिकेला सांगितले, त्यानंतर शिक्षिकेने वडिलांना शाळेत बोलवले असता, आरोपीने माफी मागितली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
14 कोटी फॉलोअर्स असणाऱ्या लता मंगेशकर केवळ ‘या’ नऊ जणांना करत होत्या फॉलो
‘मूर्ख मुली थोडी लाज ठेव,’ लता मंगेशकर यांच्या निधनानंतर अंकिता लोखंडे झाली ट्रोल; पहा व्हिडिओ
अखेर ‘रहस्य’ उलगडले! महिला डॉक्टर वाजेंचा घातपातच; थंड डोक्याने केलेल्या ‘या’ मर्डरचा झाला पर्दाफाश
वेस्ट इंडिजसोबतचा पहिला सामना जिंकताच भारतीय संघाने रचला इतिहास; वाचून वाटेल कौतूक

इतर क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now