येत्या काही दिवसात राज्यातील काही महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकांचे वेळापत्रक हे कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून शहरातील अनेक दिग्गज नेते रांगेत आहेत.(Father of 3 children wants second wife to contest elections)
असे असताना औरंगाबादमधून आत्ता एक वेगळीच बातमी समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने शहरात चक्क उमेदवार बायको हवी असे बॅनर्स लावल्याने चर्चा रंगली आहे. औरंगाबादमधील रमेश पाटील या व्यक्तीला आगामी औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी हवी आहे.
त्यांना तीन अपत्य आहेत. त्यामुळे ते निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकत नाही. त्यामुळे उमेदवार बायको पाहिजे असे बॅनर्स रमेश पाटील यांनी शहरात लावले आहेत. शहराच्या चौकात भलेमोठे बॅनर्स लावण्यात आले आहेत.
औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक 2022 मला तीन मुले असल्या कारणाने, मी निवडणूक लढवू शकत नसल्याने निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे (जातीची अट नाही) असे, त्या बॅनर्सवर छापण्यात आले आहे.
आपल्या या बॅनरवर त्यांनी पुढे लिहिले आहे कि, वय वर्ष 25 ते 40, अविवाहित / विधवा / घटस्फोटीत चालेल. फक्त 2 अपत्यपेक्षा जास्त असणारी चालणार नाही. असं लिहून रमेश पाटील यांनी आपला संपर्क क्रमांक दिला आहे.
याच बॅनरवर रमेश पाटील यांचा मोठा फोटोही लावण्यात आलेला आहे. गावात लावलेल्या या बॅनरची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा सुरु आहे. गावात लावलेले बॅनरचे फोटोसुद्धा सोसिअल मीडियावर व्हायरल होत आहेत.
महत्वाच्या बातम्या
क्रिकेटविश्वाला मोठा धक्का! २९ वर्षीय स्फोटक फलंदाजाने घेतला तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय
प्रचारासाठी आलेल्या भाजप उमेदवारावर गावकरी संतापले, ‘पाच वर्षे कुठं होता?’ म्हणत केली दगडफेक