Share

आरारारा खतरनाक! 135 मुलांच्या वडिलांनी 28 बायका, 126 नातवंडांसमोर 37 व्यांदा केलं लग्न, पहा व्हिडीओ

तुम्ही लहानपणी अनेकदा ऐकले असेल की, राजा-महाराजा अनेक विवाह करायचे आणि डझनभर बायका सांभाळायचे. पण आजच्या काळात एकापेक्षा जास्त बायका असणे ही मोठी गोष्ट मानली जाते. काही वेळा पत्नीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पण एका माणसाने ही गोष्ट चुकीची सिद्ध केली आहे. ३७ लग्नं केल्यानंतर आता एक वयस्कर व्यक्ती ३७व्यांदा लग्न करताना दिसत आहे.(Father of 135 children married 28 times in front of 28 wives)

ट्विटरवर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असे म्हटले जात आहे की व्हिडिओमध्ये दिसणारा वृद्ध व्यक्ती आपल्या २८ बायका, १३५ मुले आणि १२६ नातवंडांच्या समोर ३७ व्यांदा लग्न करत आहे. हे ऐकून सर्वजण थक्क झाले. यासोबतच ही व्यक्ती लोकांमध्ये चर्चेचा विषयही बनली आहे.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, सोशल मीडिया यूजर्स हा व्हिडीओ पाहण्यासोबतच प्रचंड शेअर करत आहेत. हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना शर्मा यांनी कॅप्शन लिहिले की, ‘सर्वात धाडसी माणूस… ३७वे लग्न तेही २८ बायका, १३५ मुले आणि १२६ नातवंडांच्या समोर’.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ आयपीएस रुपिन शर्मा यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये शेअर केला होता. जो नंतर प्रचंड व्हायरल झाला आणि आता पुन्हा एकदा हा व्हिडिओ खूप बघितला जात आहे. मात्र, हा व्हिडीओ कधी आणि कुठे बनवला हे कळू शकलेले नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकजण आपलं मत मांडताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनीही आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. लोक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. ट्विटरवर एका यूजरने लिहिले की, ‘किती मोठ नशीब आहे, इथे फक्त एकाला सांभाळणे कठीण आहे’. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘माझ्यामध्ये अजून लग्न करण्याची हिम्मत नाही आणि हे ३७’. दुसर्‍या वापरकर्त्याने खिल्ली उडवली आणि लिहिले, ‘हे पाहून जे सिंगल आहेत त्यांना RIP’.

महत्वाच्या बातम्या-
२ पेक्षा जास्त वेळा बोहल्यावर चढले आहेत हे बॉलिवूड अभिनेते, काहींनी तर ४ वेळा केलंय लग्न
अभिनेता सोहेल खानचा पत्नी सीमाला घटस्फोट; २४ वर्षांपुर्वी पळून जाऊन केले होते लग्न
“काय झालं, कसं झालं, कुठे झालं? सगळं सांगते…, दुसऱ्या लग्नाबाबत सोनाली कुलकर्णीचा खुलासा
सामाजिक बंधने झुगारत बुलढाण्याच्या पठ्ठ्याने ठेवला नवा आदर्श, विधवा भावजयीसोबत केलं लग्न

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now